आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णी-दिग्रज रोडवर 407 पलटी, नांदेडच्या वाहनचालकाचा जागीच मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी (यवतमाळ) - आर्णी परिसरातून रेती भरून जाणाऱ्या 407 वाहन दिग्रज रोडवर उलटले. यात नांदेडच्या माहूर येथील रहिवासी असलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. दिग्रज रोडवर शनिवारी सकाळी हा अपघात घडला आहे. 
 
दिगांबर नरहरी असे मृत्यूमुखी पडलेल्या चालकाचे नाव असून ते नांदेडच्या माहूर येथील किरोळी गावचे रहिवासी होते. आर्णी परिसरातील नदीवरून गाडी क्रमांक एम.एच. 02 सीई 8007 (407) मध्ये रेती भरून दिग्रज मार्गावरून जात असताना आर्णी जवळ असलेल्या पारधी बेड्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यानंतर अख्खे वाहन पलटी झाले. यात चालक दिगांबर वाहनाच्या वजनाखाली दाबले गेले. दिगांबर यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी जेसीबीची मदत घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. अपघातातील इतर दोन जखमींना आर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...