आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोककवी कर्डक यांचे अप्रकाशित वाङ‌्मय ‘समग्र वामन’ होणार प्रकाशित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - लोककवी वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित वाङ‌्मय समग्र वामन म्हणून शासनाच्या वतीने प्रकाशित करण्याबाबतच्या आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मागणीवर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने शिक्कामोर्तब केले अाहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली समतेची चळवळ घराघरांत पोहाेचवण्यासाठी तसेच बाबासाहेबांचा मानवमुक्तीचा लढा समाज प्रबोधनाच्या माध्यमातून लोककवी वामनदादा कर्डक यांनी लोकांच्या मनामनांत पेरण्याचे काम केलेले आहे. देशातील शोषित, पीडित मागास समाजाला समानतेची वागणूक मिळावी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला समतेचा लढा दृढ करण्याबरोबरच बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या वैचारिक मार्गाने चालण्‍याचा संदेश लोकरंजनातून बळकट करण्‍याचे ऐतिहासिक कार्य लोककवी वामनदादा कर्डक यांनी केले आहे. या चळवळीतील त्यांचे बरेच साहित्य हे अप्रकाशित आहे. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी हे साहित्य प्रकाशित करण्याची मागणी केली होती.
उत्तम कांबळे यांच्याकडे संपादनाची जबाबदारी
या बैठकीत लोककवी वामनदादा कर्डक यांचे अप्रकाशित साहित्य हे मंडळाकडून समग्र वामन म्हणून प्रकाशित करण्यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर वाङ‌्मय संपादनाची जबाबदारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांच्याकडे सोपविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी २२ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या पत्रान्वये आमदार सपकाळ यांना हा निर्णय कळवला आहे.
बातम्या आणखी आहेत...