आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकाकल्या सुवर्णपेढय़ा, सुमारे दहा कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आपट्याची पाने सोनं म्हणून लुटतानाच रविवारी दसर्‍याचा मुहूर्त साधून प्रत्यक्ष सोन्याचीही मोठी खरेदी झाली. पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजारासह शहरातील मोठय़ा सुवर्णपेढय़ा ग्राहकांनी फुललेल्या होत्या. सोन्याच्या दरात जादा वाढ नसल्याने अपेक्षित विक्री झाल्याचे सराफांनी सांगितले. सुमारे दहा कोटींची उलाढालीचा अंदाज आहे. मात्र, व्यापारी वर्गाकडून याविषयी दुजोरा मिळू शकला नाही.

साडेतीनपैकी एक मुहूर्त दसर्‍याचा. या दिवशी गूंजभर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. सोन्याच्या दरातील चढ-उताराचा या मुहूर्तावर परिणाम होत नाही. रविवारी 24 कॅरेट सोने 30 हजार 400 रुपये प्रती दहा ग्रॅम (तोळा)ने विकले गेले. गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणार्‍यांसाठी सुवर्णनाणी, वेढणी बाजारात आली होती. त्याचीच अधिक विक्री झाल्याचे सराफ व्यापारी म्हणाले.

ग्राहकांच्या स्वागतासाठी व्यापार्‍यांनी जय्यत तयारी केली होती. काही योजना जाहीर करून ग्राहकांना आकृष्ट केले. सकाळी ग्राहक पूजा-अर्चेत होता. त्यामुळे सराफ पेढय़ांमध्ये तुरळक गर्दी होती. सायंकाळी साडेचारला पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर काही वेळ जोरही धरला होता. पाऊस थांबल्यानंतर वातावरण मोकळे झाले आणि ग्राहक बाहेर पडले. सायंकाळी सहाच्या पुढे सराफ बाजाराची सुवर्ण झळाळी दिसून आली.