आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक ‘डॉटर्स डे’ला जन्मलेल्या 13 बाळांमध्ये 10 मुली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी, या उक्तीप्रमाणे जागतिक कन्या दिनादिवशी आज शहरातील प्रसूतीगृहामध्ये कन्यारत्नांनी बाजी मारली आहे. सोमवारी 10 मुली व 3 मुले जन्माला आली आहेत.

‘दिव्य मराठी’ने कन्या दिनानिमित्त शहरातील महत्त्वाच्या नर्सिंग होममध्ये सोमवारी रात्री 12 पासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जन्मलेल्या मुला व मुलींचे सर्वेक्षण केले. एकूण 50 हॉस्पिटलमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.

जन्मलेली बाळे
सिव्हिल हॉस्पिटल 5
श्री क्लिनिक 1
युनिक हॉस्पिटल 1
कादे हॉस्पिटल 1
सावली हॉस्पिटल 1
बॉइज हॉस्पिटल 1

शुभ संकेत देणारे क्षण आहेत. मुलींच्या संख्या वाढल्याने सामाजिक स्थिरता येते त्याची ही सुरुवात आहे असे म्हणावे लागेल.
- डॉ. सुवर्णा बासुतकर