आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंठ्याच्या प्लॉटला १० हजारांचा कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - खुल्या प्लॉटच्या खरेदी किमतीवर पाच टक्के वार्षिक कर (भांडवली मूल्यांकन) आकारणीच्या नोटिसा महापालिकेने प्लॉटधारकांना बजावण्याचे काम सुरू केले आहे. साधारणत: २००५ नंतर जागांचे भाव गगनाला गेल्याने अलीकडच्या पाच-दहा वर्षांतील प्लॉट खरेदीधारक हवालदिल झाले आहेत. हजार स्क्वेअर फुटातील घराला कर चार हजार आणि खुल्या प्लॉटला कर चौपट अशी मनपाची आकारणी आहे.

२००५-०६ पासून शहरातील जागेच्या किमती आणि शासकीय दर वाढल्याने खरेदी किंमत वाढली. खुल्या जागेच्या खरेदी किमतीवर पाच टक्के कर आकारणी आणि यूजर चार्ज लागू करण्यात आल्याने घरांपेक्षा खुल्या प्लॉटचा कर अधिक होत आहे. शहराच्या हद्दवाढ भागात सर्वाधिक व्यवहार खुल्या जागांचे या काळात झालेले आहेत. त्यामुळे प्लॉटच्या खरेदी-व्यवहराच्या पाच टक्के प्लॉटची कर आकारणी होऊ लागल्याने अनेकजण आर्थिक अडचणीत आले आहेत.

शहर : ७१३०
हद्दवाढ : ४३,९१८
एकूण : ५१,०४८
खुले प्लॉटधारक

नियमानुसार आकारणी
खुल्याजागेच्या खरेदी किमतीवर आकारणी करणे हे नियमानुसार आहे. बांधकामांना कमी तर खुल्या जागेस जास्त आकारणी होत असले तरी नियमानुसार आहे. चंद्रभागा बिराजदार, मनपा कर संकलन प्रमुख

खुल्या जागेस यूजर चार्ज : खुल्याजागेचा भोगवाटधारक ड्रेनेजलाइनचा वापर करत नाही. त्यांना मात्र मनपा दरवर्षी ६०० रुपये यूजर चार्ज आकारणी करते. यूज नाही तरी यूजर चार्ज आकारणी होते, असा अफलातून प्रकार आहे.

आकारणी नोंद नाही : खुल्याजागेतून वसुली किती आणि बांधकाम केलेल्या जागेमधून वसुली किती यांची आकडेवारी मनपाकडे नाही.

हजार चौरस फुटाला १९ हजार कर
जुळेसोलापुरात हजार चौरस फूट खुल्या जागेचा शासकीय दर सुमारे १२ लाख रुपये आहे. पालिकेने कर आकारणी भांडवली करमूल्यांकनानुसार केल्यास सुमारे १९ हजार ९१० रुपये इतका कर होतो. याच प्लॉटवर बांधलेले घर असल्यास दोन हजार ३०० रुपये मिळकतकर, २७५६ रुपये नळ, ६०० रुपये इतर असे ५६५० रुपये करआकारणी केली जाते.

का वाढला कर
१९९२मध्ये हद्दवाढ झाली. हद्दवाढ भागात प्लॉट खरेदी करणारांची संख्या वाढली. त्यावेळी स्थायी समितीने खरेदीवर पाच टक्के कर आकारणीचा ठराव केला. २००६ मध्ये जागेच्या किमती अचानक वाढल्या. घरजागेची कर आकारणी प्रतिचौरस मीटर ३०० रुपये इतकी आहे. याउलट खुल्या प्लॉटची करआकारणी भांडवली करमूल्यांनानुसार होत आहे.
बातम्या आणखी आहेत...