आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीपीएल, अंत्योदय लाभार्थींना प्रत्येकी १०० रूपये अनुदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्य सरकारने अंत्योदय दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी १०० रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अट एकच असणार आहे, ती म्हणजे संबंधित लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांकाशी आधार क्रमांक लिंक केले असले पाहिजे. शहर-जिल्ह्यात बीपीएल यासाठीच १२ एप्रिल रोजी गावागावांत आधार क्रमांक बँक खाते क्रमांक घेण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या निर्णयाने गरीब कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
राज्याला २८ कोटी ५४ लाख...

बँकखाते क्रमांकाशी आधार क्रमांकाची लिंक देण्यासाठी शासनाने प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून १०० रुपये देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यात २८ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीचे वाटप झाल्यानंतर कमी पडलेला निधी देण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक कोटी लाख रुपयांचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे, त्याखालोखाल नाशिक कोटी ३८ लाख, जळगाव अहमदनगर कोटी २५ लाख ९४ हजार रुपयांचा िनधी देण्यात आला आहे.

कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर...

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनी आधार क्रमांक बँक खाते क्रमांक लिंक केल्यानंतर प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून १०० रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्याला कोटी १५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लिंक झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात येणार आहे.'' रमेश चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी.

१४ लाख ५३ हजार लाभार्थी...

शहर-जिल्ह्यात प्रोत्साहनात्मक अनुदान मिळण्यासाठी पात्र असलेले १४ लाख ५३ हजार लाभार्थी आहेत. यामध्ये अंत्योदयचे लाख हजार ७६५, तर बीपीएलखाली असलेले १० लाख ४५ हजार ४११ लाभार्थी आहेत. शहरामध्ये अंत्योदयचे २५ हजार ७३४ तर बीपीएलखाली ७८ हजार४४० लाभार्थी आहेत. शासनाकडून आदेश प्राप्त होताच पात्र कुटुंबातील सदस्यांकडून आधार क्रमांक बँक खाते क्रमांक जमा करण्याची मोहीम राबविली जात आहे.

प्रत्येक गावात विशेष मोहीम...

नवीन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारकडून वैयक्तिक योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अधिक पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जन-धन योजनेद्वारे अधिकाधिक नागरिकांचे बँक खाते काढण्याचा प्रयत्न झाला. बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी १२ एप्रिल रोजी गावागावांत विशेष मोहीम राबविली गेली. यामध्ये प्रत्येक नागरिकांकडून आधार क्रमांक बँक खाते क्रमांक घेण्यात आले.