आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल-रुक्मिणीचा कल्याण उत्सव भक्तिभावात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भावसार क्षत्रिय समाजाच्या विठ्ठल -रुक्मिणी मंदिर स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचा सांगता समारंभ मे रोजी शनिवारी कल्याण उत्सव सोहळ्याने झाला. यात मंत्रोच्चारपूर्वक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भावसार क्षत्रिय समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या तीन दिवसांपासून भांडे गल्ली येथील भावसार क्षत्रिय समाजाच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शनिवारी सकाळी १० वाजता साखर पेठ येथील िहंगुलांबिका मंदिरपासून विठ्ठल-रुक्मिणी उत्सवमूर्तीच्या सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. सनई, चौघडे, बॅन्डच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत ५१ सुवासिनींचा डोक्यावर कलश घेऊन सहभागी होता. हिंगुलांबिका मंदिरपासून िनघालेली मिरवणूक साडेअकराच्या सुमाराला भांडे गल्ली येथील मंदिराजवळ पोहोचली. यानंतर मंदिरात मंत्रोच्चरात विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला. साडेबाराच्या सुमाराला विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह झाला.
विवाह सोहळ्यानंतर प्रसादाचे वाटप झाले. या वेळी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष विद्या कटारे, सचिव श्रीकांत निकते, किशोर कटारे, रवी सूत्रावे, बाळसाहेब जवळकर, मोहन माळवदकर, अतुल भावसार, िकरण क्षीरसागर, अनिल अन्ने, सुनील अन्ने आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...