आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वी प्रवेशाचा प्रश्न क्लिष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर शहरात विज्ञान शाखेसाठी केवळ 50 तुकड्या असून त्यातून चार हजार 480 विद्यार्थ्यांना अकरावी विज्ञान शाखा मिळू शकते. मात्र, विज्ञान शाखेला प्रवेश पाहिजे असणार्‍या इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त असल्याने यंदा अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली आहे.

शहर वगळता उर्वरित जिल्ह्यात 132 तुकड्या विज्ञानसाठी आहेत. यातून 11 हजार 440 विद्यार्थी सामावले जाऊ शकतात. प्रत्यक्षात शहरातील विद्यार्थ्यांसाठी दुपटीने विज्ञान शाखा वाढवणे गरजेचे असले तरी शासन निर्णयानुसार केवळ विनाअनुदानित तुकड्या मंजूर होऊ शकतात. पर्यायाने हजारो विद्यार्थ्यांना नाईलाजाने इतर शाखांचा विचार करावा लागतो आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालक विविध महाविद्यालयांच्या पायर्‍या झिजवत आहेत. यंदापासून अकरावीसाठी डोनेशन आणि अवाजवी फी सांगितली जात आहे. यामुळे अनुदानित तुकड्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. कला शाखेची प्रवेश क्षमता पाच हजार 640 इतकी असली तरी या जागांवर 50 टक्केही प्रवेश होऊ शकलेला नाही. वाणिज्यची प्रवेश क्षमता केवळ दोन हजार 320 इतकी सीमित असल्याने पुरेसे विद्यार्थी या शाखेकडे वळत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळाला नसेल, त्यांनी मूळ गुणपत्रिका व मूळ शाळा सोडल्याचा दाखला घेऊन 3 जुलैपासून माध्यमिक शिक्षण विभागाकडे संपर्क साधावा, रिक्त जागेनुसार अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती सुतार यांनी दिली.

बुधवारी प्राचार्यांची बैठक
2 जुलैपर्यंत प्राचार्यांच्या अखत्यारीत प्रवेश दिला जाईल. रिक्त जागांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी दुपारी चार वाजता वालचंद महाविद्यालयात प्राचार्यांची बैठक आयोजिली आहे. त्यानंतर अकरावी प्रवेशाचे सद्यचित्र स्पष्ट होईल.’’ सूर्यकांत सुतार, शिक्षण उपनिरीक्षक, माध्यमिक विभाग