आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठातर्फे 11 महिला सरपंचांना पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुलातर्फे जिल्ह्यातील 11 महिला सरपंचांच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संचालक डॉ. ई. एन. अशोककुमार यांनी दिली.

येत्या 15 ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन जगभर साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधून सोलापूर विद्यापीठाने अकरा कर्तृत्ववान महिला सरपंचांना पुरस्कार घोषित केला आहे. मंगळवारी (दि. 15) सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात आमदार प्रणिती शिंदे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सरपंचांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार असतील. कार्यक्रम समन्वयक डॉ. गौतम कांबळे आहेत. र्शी. कांबळे म्हणाले, ‘सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांची सद्य:स्थिती हा अहवालही यानिमित्ताने प्रकाशित करण्यात येईल. महिला सरपंचांची निवड करताना काही निकष लावण्यात आले आहेत. उदा. नरेगा कार्यक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी, तंटामुक्त गाव अभियान राबवणे, निर्मलग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, ग्रामसभा बैठकांचे आयोजन, उल्लेखनीय कामगिरी विचारात घेतली गेली आहे.’

पुरस्कारप्राप्त तालुके आणि महिला सरपंच असे
मंगळवेढा : (खवे) महानंदा संजय शिंदे
अक्कलकोट : (बुर्‍हाणपूर) साजिदा अहमद पिरजादे
बार्शी : (ईर्लेवाडी) बालिका भीमराव गायकवाड
मोहोळ : (अनगर) सीता राजू वाघमारे
माळशिरस : (पठाण वस्ती) कविता अनिल सरतापे
माढा : (वेताळवाडी) सुवर्णा विजय गायकवाड
करमाळा : (भोसे) केशर साधू कांबळे
पंढरपूर : (शेळवे) गोकुळा अमेश भोसले
सांगोला : (भोपसेवाडी) सुनीता बिरा गावडे
उत्तर सोलापूर : (मार्डी) सुजाता श्रीकांत मार्तंडे
दक्षिण सोलापूर : (कुडल) इंदिरा बसवराज भिंगे
वितरण : 15 ऑक्टोबर स्थळ : विद्यापीठ