आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता, वेळापत्रक डावलल्यास करा तक्रार, अकरावी प्रवेश प्रक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज विक्री सुरू झाली आहे. ५० रुपयांपेक्षा अधिक रक्कम प्रवेश अर्जासाठी महाविद्यालयांना घेता येणार नाही. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गुणवत्ता अथवा वेळापत्रक डावलण्याचा प्रयत्न होत असल्यास विद्यार्थी अथवा पालकांना शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देता येईल. वेळापत्रका नुसारच प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश साहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक सूर्यकांत सुतार यांनी दिले आहेत.
१५ जूनपासून विद्यार्थ्यांना कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करता येतील. त्याच दिवशी गुणपत्रिका मिळत असल्याने याच दिवशी अर्ज विक्रीसाठी गर्दी होईल अर्जासमवेत दहावी गुणपत्रिका शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित झेरॉक्स प्रत देणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवेशासाठी जात प्रमाणपत्राची साक्षांकित झेरॉकस प्रत लागेल. २५ जूनपर्यंत अर्ज सादर करण्यात यावेत. पहिली गुणवत्ता यादी २९ जून रोजी लागणार आहे.