आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Lakh Case Of Siphoning An Offense Against Rasale ,Sonawane

12 लाखाचा अपहार - रसाळे, सोनवणे यांच्यावर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या इमारत नूतनीकरणात 12 लाख 26 हजार 770 रुपयांचा अपहार झाल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात सोमवारी नोंद झाली. त्यानुसार मंडळाचे माजी सभापती सुनील नारायण रसाळे, माजी प्रशासनाधिकारी सत्यवान धर्मा सोनवणे, लिपीक इब्राहिम बुडणसाब हुबळीकर, जगदीश काटेवाल आणि मक्तेदार र्शीरंग प्रभाकर नादरगी यांच्या विरोधात फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबतची अधिक माहिती अशी : नवी पेठेतील मंडळाच्या इमारतीची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याचा मक्ता 2012 मध्ये काढण्यात आला होता. त्या वेळी रसाळे सभापती तर सोनवणे प्रशासनाधिकारी होते. 24 लाख रुपयांचा हा मक्ता होता. परंतु प्रत्यक्षातील कामे पाहता, निम्म्या रकमेचा अपहार झाल्याचा आरोप मंडळाच्या विरोधी सदस्यांनी केला. दरम्यानच्या काळात झालेल्या लेखापरीक्षण अहवालात ठपका ठेवला होता. तत्कालीन महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी त्याबाबत दखल घेतली नाही. त्यांच्यानंतर रूजू झालेले चंद्रकांत गुडेवार यांनी मात्र इन कॅमेरा त्याची चौकशी केली. त्यात 12 लाख 26 हजार 770 रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आले. आयुक्त गुडेवार यांच्या आदेशानुसार विद्यमान प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी ही फिर्याद दिली.