आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014 लक्ष समोर ठेवत सोलापूर महापालिकेचा १४०० कोटींचा आराखडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेने २०४१ चे लक्ष्य समोर ठेवून शहराचा विकास आराखडा तयार केला आहे. त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून नव्या वर्षात हा आराखडा केंद्राकडे सादर होणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी वितरित करताना या आराखड्याचा फायदा होईल. या आराखड्यात पाणीपुरवठ्यासाठी १४००कोटीरुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव आहे. नव्या वर्षात केद्रांची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर विकासाला चालना मिळेल.
सोलापूर शहराला जोडणाऱ्या तीन महामार्गांचे विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यातील सोलापूर-पुणे महामार्गाचे लोकार्पण झाले असून यावर्षी बाळे, टेंभुर्णी येथील काम पूर्ण होईल. तसेच, सोलापूर-धुळे सोलापूर-हैदराबाद महामार्गाचे काम सुरू झाले असून नव्या वर्षात प्रथम टप्पा पूर्ण होऊन विकासाला चालना मिळेल.
बोरामणी विमानतळ
बोरामणी विमानतळाचे तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादन निर्वनीकरणास परवानगी या दोन्ही गोष्टी २०१५ मध्ये मार्गी लागतील, राज्य शासनाकडून निधी मिळाल्यास विमानतळाच्या प्रत्यक्ष विकास कामास सुरू होण्याची शक्यता.
प्राथमिक शिक्षण
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ग्रामीण गुणवत्ता विकास कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येईल. ६२ धोकादायक शाळा खोल्या पाडून त्या ठिकाणी नवीन वर्ग खोल्या बांधण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
हुतात्मा सेवेत
शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिराचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात ते कलावंत आणि रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.'
हे राहतील चर्चेत
सोलापूरची महिलाक्रिकेटपटू अनघा देशपांडे बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे या दोघी आंतराराष्ट्रीय पातळीवरील आपल्या कामगिरी अव्वल राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील.