आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दसरा सण, धम्मचक्र प्रवर्तन दिन, आरएसएस संचलन मिरवणूक रविवारी होणार आहेत. तसेच रूपाभवानी पालखी मिरवणूक, शक्तिदेवी मिरवणूक, सीमोल्लंघनामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून सुमारे दीड हजार पोलिसांचा ताफा सज्ज आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथक सोलापुरात आले आहे. दरम्यान, शनिवारी जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रूटमार्च करण्यात आला. पोलिस निरीक्षक अनिल दबडे व त्यांचे पथक सहभागी झाले होते.

शक्तिदेवी मिरवणूक मार्ग : तेरा मंडळ मिरवणुकीत सहभागी आहेत. क्रांती चौक, मंगळवार चौकी, मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा, मार्केट पोलिस चौकी, पार्क चौक ते शमीवृक्ष. मोदी शक्तिदेवी मिरवणूक : मोदी, जगजीवनराम वस्ती, र्शीरंग चौक, यतिराज हॉटेल, सात रस्ता, मोदी चर्च ते रेवणसिध्देश्वर मंदिरापर्यंत. जुळे सोलापुरात रात्री रावण दहन कार्यक्रम आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूक
रमाबाई आंबेडकर नगर, सम्राट चौक, पांजरपोळ चौक, सरस्वती चौक, डॉ. आंबेडकर पुतळा, जुना एप्लॉयमेंट चौक, बुध्द विहार फॉरेस्ट. एकूण 28 मंडळे सहभागी होणार आहेत. समता सैनिक दलातर्फे नॉर्थ कोट मैदानावर मानवंदना कार्यक्रम आहे.

असा आहे बंदोबस्त
तीन पोलिस उपायुक्त, चार सहायक आयुक्त, 23 पोलिस निरीक्षक, 44 फौजदार, 832 पोलिस, 48 महिला पोलिस, 300 होमगार्ड, स्ट्रायकिंग फोर्स 06, एसआरपीएफ एक पथक, सीआरपीएफ एक पथक. मिरवणूक मार्गावर वाहनांना बंदी राहील. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.