आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'दामाजी'मध्ये बीओटीवर १८ मेगावॅट वीज प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - दामाजीसाखर कारखान्याची गाळप क्षमता वाढावी, तसेच शेतक-यांच्या उसाला जास्तीचा दर देता यावा यासाठी बीओटी तत्त्वावर को- जन सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

कारखान्यावर एकही रुपयांचा आर्थिक बोजा पडता १८ मेगावॅट वीज निर्मितीबरोबर अडीच हजार मेट्रिक टनवरून चार हजार मेट्रिक टन गाळप क्षमता वाढणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी अध्यक्ष सूर्यकांत ठेंगील यांनी दिली. दरम्यान विरोधी गटातील संचालक बबनराव आवताडे यांनी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचा घाट घातल्याचा आरोप करत यामुळे कारखाना १० वर्षे मागे जाणार असल्याचे म्हटले आहे. वार्षिक सभेत सभासदांनी या विषयाला बहुमताने मंजुरी दिली असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.