आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Bus Stands In Padharpur, 3 Thousand 350 Vehicles

पंढरपुरात 2 बसस्थानक, राज्यातून ३३५० गाड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आषाढी एकादशी ताेंडावर येऊन ठेपली असून भक्तांसह प्रशासनाला आता पंढरीच्या वारीचे वेध लागले आहे. पंढरपूरच्या वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही जोरदार तयारी केली आहे. पंढरपूर येथे दोन नवे बसस्थानक सुरू करण्यात येणार आहेत. पंढरपूरसाठी राज्यभरातून सुमारे हजार ३५० एसटी गाड्या सोडण्यात येतील. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दोनशे अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतल्याची माहिती सोलापूर विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.

पंढरपूरच्या वारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी पुण्यातील भोसरी येथील एसटीच्या प्रशिक्षण केंद्रात परिवहन मंत्री दिवाकर रावते परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सोलापूरचे विभाग नियंत्रक जोशी उपस्थित होते.
यंदा आषाढीत भाविकांची सोय व्हावी म्हणून एसटी प्रशासन पंढरपुरात तात्पुरत्या स्वरूपाचे दोन नवे बसस्थानक उभारणार आहे. यात भीमा बसस्थानकासह गुरसाळे गावाजवळील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावरही बसस्थानक उभारले जाणार आहे. पंढरपूर मध्यवर्ती बसस्थानकासह दोन नवे बसस्थानक उभारले जात असल्याने वारीच्या काळात बसस्थानक सज्ज असतील.

यंदाच्या वेळीही शटल बस सेवेची आहे व्यवस्था
भीमाविठ्ठल कारखान्याच्या बसस्थानकावर भाविकांना पोहचण्यासाठी तेथून येण्यासाठी एसटीकडून खास शटल बस सेवा असणार आहे. त्यामुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे. शटल बस सेवेमुळे भाविकांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे त्यांचा प्रवास सुरक्षित कमी पैशात होणार आहे. खासगी वाहतूकदारांना चांगलाच चाप बसणार आहे.

कारखाना बसस्थानकातून ६०० गाड्यांचे नियोजन
गुरसाळे गावाजवळील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मैदानात नवीन बसस्थानक असणार आहे. शनिवारपासून याचे काम सुरू हाेईल. सुमारे ६०० गाड्यांचे ऑपरेशन येथून हाेणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नगर येथून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी या स्थानकाचा वापर होणार आहे.

जाहिरातीतून करणार भाविकांना मार्गदर्शन
वारीकाळात तिन्ही बसस्थानकावरून भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातींचा वापर केला जाणार आहे. कोणत्या गाड्या कोणत्या बसस्थानकावरून सुटणार याची २४ तास उद्घोषणा करण्यात येईल. त्यामुळे परगावच्या भक्तांना आपल्या गावची एसटी कोठे आहे याची माहिती मिळेल.