आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Lakh Funding For Solapur Corporation School From Teacher

ई-लर्निंगच्या सुविधेसाठी शिक्षकांनी दिले महापालिकेस 2 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने महापालिकेच्या शाळेसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली आहे. त्यात महापालिका शिक्षण मंडळ एक लाख रुपये घालून येत्या शैक्षणिक वर्षातून मुलांसाठी अत्याधुिनक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.
यामध्ये १० शाळांना इंटरअॅटिव्हिटी बोर्ड देण्यात येणार आहेत. जेणेकरून मनपा शाळेतील मुलांना दर्जेदार गुणवत्तेचे शिक्षण देण्याचा ध्यास मनपा शाळेतील शिक्षकांनी घेतला आहे.
महापालिकेच्या मराठी, उर्दू, कन्नड, तेलुगु माध्यमांच्या शिक्षकांनी एकत्र येऊन स्वेच्छेने रक्कम गोळा करण्याचा संकल्प केला आणि केवळ पाच दिवसांत सर्व शिक्षकांनी किमान एक हजार रुपये दिले. या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये गोळा करण्यात आले आहेत.
किमान १० शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षात ई-लर्निंगसाठी आवश्यक इंटर अॅक्टिव्हिटी बोर्ड बसविण्यात येणार आहे. यासाठी संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, उपाध्यक्ष अझर पंजेवाळे, सचिव अमोल भोसले, स्वप्निल चाबुकस्वार, भगवान मुंडे, सादिक बागवान, संतोष जाधवर, फजल शेख, आनंद सामल यांनी पुढकार घेतला आहे.

सर्व शाळांसाठी ई-लर्निंगचा संकल्प

सध्या प्रायाेगिक तत्त्वावर येत्या शैक्षणिक वर्षातून १० शाळांमध्ये इ-लर्निंग शिक्षण चालू करण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत सर्व शाळांमध्ये इ-लर्निंग चालू करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधींना याबाबत मदतीचे आवाहन शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणखी मदत मिळेल, अशी आशा आहे.” विष्णू कांबळे, प्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ

मनपा शाळांबद्दलचा दृष्टिकोन बदलणार

मनपा शाळेना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. इतर खासगी शाळांमध्ये ज्या पध्दतीने शिक्षण दिले जाते त्याच पध्दतीने मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. मनपा शाळेबाबत पूर्वग्रह झाला आहे. तो पुसून काढण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. तो दृष्टिकोन बदलण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.” अमोल भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघ

काय आहे डिजिटल शिक्षण इंटर अॅक्टिव्हिटी बोर्ड?

या बोर्डद्वारे डिजिटल पध्दती शिक्षण दिले जाते. यामध्ये एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. तसेच इतर ठिकाणी जे चांगले शिक्षण दिले जाते त्याचे इंटरनेटद्वारे शिक्षण घेता येऊ शकते. त्याची सोय करण्यात येणार आहे.