आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20 Thousand Crore Turnover In Vehicle Market Of Solapur

वाहन बाजारात आज होणार सुमारे वीस कोटींची उलाढाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दसर्‍याच्या मुहूर्तावर 500 मोटारसायकली आणि 200 मोटारकार अशी समारे 700 नवी वाहने सोलापूरच्या रस्त्यांवर उतरणार आहेत. ग्राहकांच्या हाती त्याच्या चाव्या देण्यासाठी वितरकांनी मोठी तयारी केली आहे. यासह अन्य लहान मोठी अशा वाहन विक्री क्षेत्रातून सुमारे 20 कोटींची उलाढाल होण्याच्या अंदाज आहे. हिरो-कॉर्प आणि मारुती-सुझुकीच्या वाहनांचे वितरक चव्हाण मोटर्समधून तब्बल 300 मोटारसायकली तर सव्वाशे मोटारकार बाहेर पडणार आहेत.

‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ अशी म्हण आहे. या शुभमुहूर्तावर मोठी खरेदी असते. त्याची जय्यत तयारी असते. एकाच दिवशी मोठय़ा प्रमाणात वाहने ग्राहकांच्या हाती देण्याची यंत्रणा उभी केलेली असते. तशीच तयारी राहुल ह्युंदाई, स्टर्लिंग मोटर्स, डीएसके टोयाटा आणि चव्हाण मोटर्सनी केली. दुचाकी वाहनांचे वितरक लक्ष्मी ऑटोमोबाइल्स, आहेरकर बजाज, कायझन होंडा, गांधी टीव्हीएस यांच्या दालनातही शनिवारी रेलचेल होती.

स्प्लेंडर, स्कुटीची क्रेझ कायम
दुचाकीत अनेकविध मॉडेल आले तरी ‘स्प्लेंडर’ची क्रेझ कायम आहे. ‘मध्यमवर्गीयांची गाडी’ अशी ओळख असल्याचे वितरकांनी सांगितले. हीरो प्लेजर, टीव्हीएसची स्कुटी, कायझनची अँक्टिव्हा या महिलांच्या गाड्यांना मोठी मागणी आहे.

अल्टो, स्वीफ्टला ग्राहकांची पसंती
चारचाकी वाहनांमध्ये अल्टो, स्वीफ्ट डिझायर, व्ॉगन-आर या गाड्यांना मोठी मागणी आहे. त्यातल्या त्यात पेट्रोलवर चालणार्‍या आणि जादा मायलेज देणार्‍या गाड्यांना ग्राहकांनी पसंती दिली. 125 चारचाकी वाहने ग्राहकींच्या हाती सुपूर्द करत आहोत.’’ शिवप्रकाश चव्हाण, संचालक, चव्हाण मोटर्स

ह्युंदाईची 35 वाहने; कार्यक्रमाचे आयोजन
राहुल ह्युंदाईच्या पुणे रस्त्यावरील दालनातून सकाळी दहाला 35 वाहने ग्राहकांच्या हाती देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्युंदाईची विविध रंगांतील अनेकविध मॉडेल्स बाजारात आल्या. त्या सर्व सोलापूरच्या ग्राहकांना देण्याचे प्रयत्न केले.’’ अभिषेक शहा, संचालक, राहुल ह्युंदाई