आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात आहेत तब्बल 20 हजार काचबिंदू रुग्ण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अंधत्व येण्यामागच्या महत्त्वाच्या कारणांपैकी दुसर्‍या क्रमाकांचे कारण म्हणजे काचबिंदू. त्याने सोलापुरातील सुमारे 20 हजार जण त्रस्त आहे. जनजागृतीसाठी 10 ते 17 मार्च दरम्यान जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा केला जातो. वेळेवर उपचार झाल्यास अंधत्व टळू शकते. मात्र, याची लक्षणे स्पष्ट नसल्याने तो चोरपावलांनी येणारा आजार म्हणून ओळखला जातो. देशात सुमारे एक कोटी 20 लाख काचबिंदूने त्रस्त असावेत असा अंदाज आहे. 2020पर्यंत ही संख्या एक कोटी 60 लाखांवर जाण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. डायबिटीज, मायग्रेन, उच्च रक्तदाब, डोळ्यांचा नंबर वजा किंवा घरात काचबिंदूची पार्श्वभूमी आहे, अशांनी तपासणी करणे गरजेचे आहे.

काही लक्षणे
काहींना लक्षणे जाणवत नाहीत
चष्म्याचा नंबर लवकर बदलतो
अंधारात गेल्यावर कमी दिसतं
बाजूने माणूस किंवा वाहन गेलेले न दिसणे
कशामुळे होतो काचबिंदू
काचबिंदू म्हणजे डोळ्यातील प्रेशर वाढण्याचा परिणाम आहे. डोळ्यांतील अांतरदाब वाढतो. त्याचे कारण डोळ्याच्या आतील द्रवाच्या अभिसरणामध्ये अडथळा येणे आहे. दृष्टीची संवेदना मेंदूकडे नेणारी मज्जारज्जू यामुळे सुकत जाते.
मधुमेहींना जास्त धोका
प्रत्येक मधुमेहींना काचबिंदू होतोच, असे नाही. पण त्यांना होण्याची शक्यता जास्त असते. मधुमेह रुग्णांमध्ये काचबिंदू हळूहळू डोळ्यातल्या रेटिनावर परिणाम करायला लागतो. या बदलांना सुरुवात होते तेव्हा लगेच नजरेवर परिणाम होत नाही. म्हणजे तो लक्षात येत नाही. वेळी लक्षात न आल्याने इलाज अवघड होऊन बसते. म्हणून मधुमेहींना याचा जास्त धोका असल्याचे दिसून येते. काचबिंदूवर शासकीय पातळीवर योजना नाही. उपचार किंवा जनजागृती केली जात नाही.