आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस खरेदीवर उद्या ‘परिवहन’ची सभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नवीन 200 बस खरेदीच्या विषयावर परिवहन समितीची सोमवारी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. अशोक लेलँड (चेन्नई) व व्हॉल्वो बसेस इंडिया (बंगळुरू) या दोन कंपन्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे बस खरेदीचा प्रस्ताव आहे. महापालिका प्रशासनाने बोलावलेल्या निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांनी भाग घेतला होता.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहर पुनर्विकास मिशनअंतर्गत शहर बस सुधारणेसाठी सोलापूर महापालिकेस योजना मंजूर झाली आहे. यासाठी 111 कोटी सहा लाख 40 हजार रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकार 80 टक्के, राज्य सरकार 20 टक्के रक्कम देणार आहे.

प्रकार 1 : अशोक लेलँड कंपनीचे 650 एमएमचे नॉन एसी मॉडेल. सर्व करासहीत एका बसची किंमत 55 लाख 60 हजार. देखभालीसाठी प्रतिकिमी पहिल्या वर्षी 5.84 रुपये तर दुसर्‍या वर्षी 8.51, तिसरे 11.70, चौथे 14.20, पाचवे वर्ष 17.75 रुपये.

प्रकार 2 : अशोक लेलँड कंपनीचे 900 एमएमचे नॉन एसी मिनी मॉडेल. सर्व करासहीत एका बसची किंमत 29 लाख 15 हजार. देखभालीसाठी प्रतिकिमी पहिल्यावर्षी 5.59 रुपये तर दुसर्‍या वर्षी 7.10, तिसरे 8.38, चौथे 11.33 आणि पाचवे वर्ष 13.55 रुपये.

प्रकार 3 : व्हॉल्वो बसेस इंडिया, प्रिमीयम सेंगमेंट एसी मॉडेल, सर्व करासहीत एका बसची किंमत एक कोटी सहा लाख 12 हजार. देखभालीसाठी प्रतिकिमी पाच वर्षासाठी 13.55 रुपये (ब्ल्यू युरिया टाकण्यासाठी प्रतिकिमी अतिरिक्त दोन रुपये).

बससेवा सुधारणा
प्रथम नमुना स्वरूपात तीन वेगवेगळ्या प्रकारचे बस खरेदी करण्यात येणार आहे. यात एक वातानुकूलित बसचा समावेश आहे. त्याचे टेंडर काढले असून, सोमवारी परिवहन समितीने मान्यता दिल्यानंतर दोन कंपनीस तीन बस खरेदीसाठी वर्कऑर्डर देण्यात येणार आहे. त्यानंतर 197 बस खरेदीसाठी वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे.

खरेदी आणि देखभाल असे, 175.90 कोटींचे काम
200 बस खरेदी आणि पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी 175.90 कोटींचा विषय परिवहन समितीपुढे आहे. त्यासाठी तातडीने समितीची विशेष सभा सोमवारी सकाळी 11.30 वाजता स्थायी समितीच्या सभागृहात बोलावण्यात आली आहे. शुक्रवारी अजेंडा काढून शनिवारी तातडीने सदस्यांना देण्यात आल्याची माहिती नगरसचिव ए. ए. पठाण यांनी दिली.