आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०० लिटर दूध रस्त्यावर दराच्या आंदोलनात स्टंटबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनहित शेतकरी संघटनेने बुधवारी सकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (पार्क) बुधवारी २०० लिटर दूध रस्त्यावर सांडून आंदोलन केले. दुधाला योग्य दर मिळावा, ही आंदोलनकर्त्यांची मागणी एका परीने रास्तच आहे. परंतु त्यासाठी आंदोलनकर्त्यांनी निवडलेला मार्ग भरकटला. त्यामुळे हे आंदोलन दुधाला दर मिळावा या मागणीसाठी होते की प्रसिद्धीसाठी नुसताच स्टंट होता याविषयी शंका उपस्थित झाली आहे.

महागाईच्या दिवसांत ग्राहकाला दुधासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. परंतु ते पैसे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकाला योग्य दर मिळावा ही मागणी रास्त आहे. याविषयी इतर मार्गानेही शासनाचा निषेध नोंदवता आला असता. संघटनेने दिलेल्या निवेदनामध्ये शासनाने दुधाच्या एका लिटरमागे रुपयांनी दर कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. दुधापासून तयार होणाऱ्या मिठाई आदी पदार्थांच्या किमती मात्र प्रचंड आहेत. याबाबत शासन कोणताही निर्णय घेत नाही. एकीकडे पशुखाद्यांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. याबाबत शासन कोणताही निर्णय घेत नसल्याचे दिसते. शासनाने प्रति लिटर गायीच्या दूधाला २५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये दर देण्याची मागणी निवेदनात केली आहे.

दुधाला भाव कवडीमोल
म्हैशीचेदूध २७ रुपये : मागणी : ३५ रुपये
गाईचे दूध १७ रुपये : मागणी : २५ रुपये
दिवसाला चारा खर्च : १५० रुपये

शासन-प्रशासनगेले झोपी
११नोव्हेंबर : जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा
१५ नोव्हेंबर : कुरूल चौकात रस्ता रोको
१० डिसेंबर : सोलापुरात बेमुदत धरणे
मालमत्तेचे नुकसान करता येत नाही
^सर्वांनाआंदोलन करण्याचा अधिकार आहे पण शांततेत आणि कोणतेही नुकसान करता. दूध सांडून आंदोलन करणे हे चुकीचे आहे. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करता ठीक आहे. गरीब शेतकऱ्यांना द्या. दूध सांडून नुकसान करण्याचा आधिकार नाही. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गंत सर्व खाद्यपदार्थांचे संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी आहे. अॅड.पी. बी. लोंढे-पाटील

बेशरमशासनाचे लक्ष वेधण्यासाठी...
^सरकारलाआमच्या भावना लक्षात येत नाहीत. पशुधन सांभळता येईल, इतकेही पैसे दुधातून मिळत नाहीत. मग दूध ओतून संताप व्यक्त केल्याने स्टंटबाजी कसे म्हणणार. आम्ही गरिबांना दूध देऊन आंदोलन करू इच्छित होतो. परंतु बेशरम शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पर्याय नव्हता. आम्ही धरणे आंदोलन तर करीत आहोतच. भय्यादेशमुख, संघटनाप्रमुख