आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2014 Lok Sabha Election Give Dimesion To The History Kumar Ketkar

2014 मध्ये होणार्‍या निवडणुका इतिहासाला कलाटणी देणार्‍या ठरतील - कुमार केतकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उग्र हिंदुत्ववाद्यांनी विकासाच्या नावाखाली जी चळवळ उभी केली, ती नथुरामाच्या (गोडसे) उत्तरार्धाची आहे. त्याला वरकरणी काँग्रेसविरोधी असंतोष, भ्रष्टाचार आणि महागाईविरोधातील कल अशी नावे मिळत असली तरी त्यामागच्या शक्ती विघटनवादी आहेत. या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये होणार्‍या निवडणुका इतिहासाला कलाटणी देणार्‍या ठरतील, असे प्रतिपादन ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी रविवारी येथे केले.
सोलापूर र्शमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रमहर्षी रंगण्णा वैद्य स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन र्शी. केतकर यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व र्शीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी एजाज हुसेन मुजावर यांना पत्रमहर्षी बाबूराव जक्कल जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 15 हजार रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी न्यायमूर्ती भीमराव नाईक यांची उपस्थिती होती.
केतकर म्हणाले, ‘‘1977 मध्ये जनता पक्षाने काँग्रेसला पराभूत केले. तेव्हाच्या राजकीय पंडितांनी देश काँग्रेसमुक्त झाल्याचे सांगितले. परंतु त्या वेळीही काँग्रेसकडे लोकसभेच्या 153 जागा होत्या, हे विसरून चालणार नाही. आज काँग्रेसला 128 वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु जनता पक्ष कुठेही दिसत नाही. देशाला दुसर्‍यांदा स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे सांगणार्‍या जयप्रकाश नारायण यांना देश चळवळीत ठेवायचा होता. मूल्यांना टिकवायचे होते. त्यांच्या पक्षात काँग्रेसचेच पुढारी होते. देश काँग्रेसमुक्त करण्याच्या महागर्जनेची वर्तमान स्थिती मात्र वेगळी आहे. त्यांनी देशासमोर आव्हान उभे केले आहे.’’
अध्यक्षीय भाषणात न्या. नाईक यांनी सोलापुरातील आठवणी सांगितल्या. शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाचा वेध घेतला. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी स्वागत केले. निवड समिती सदस्य प्रा. विलास बेत यांनी प्रास्ताविक, तर श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.