आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँडेड कंपनीचे महागडे 21 मोबाइल केले जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - चोरीच्या महागड्या किमतीच्या 21 मोबाइलची विक्री करताना एका महिलेला गुरुवारी सदर बझार पोलिसांनी अटक केली. जप्त केलेल्या सर्व मोबाइलची नोंद पोलिस दप्तरी 57 हजार केली असली तरी बाजारभावाप्रमाणे या मोबाइलची किंमत लाखाच्या घरात आहे.

गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरातील बसस्टॉपजवळ फर्जाना अब्बास शेख (वय 30, रा. नई जिंदगी परिसर) ही महिला एका कॅरीबॅगमध्ये मोबाइल हॅण्डसेटची विक्री करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. ही खबर मिळताच पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक थोरात यांनी सापळा लावून मोबाइल विक्री करणार्‍या महिलेला रंगेहाथ पकडले.

महिलेकडे सॅमसंग, नोकिया, कार्बन, मॅक्स्, ब्लॅकबेरी कंपन्यांचे 21 नामवंत हॅण्डसेट आढळले. या कामगिरीत हवालदार अतुल न्यामणे, संतोष फुटाणे, रवी धेंडे, काटकर, प्रसाद कुलकर्णी, तिमीर गायकवाड, सुभाष पवार, गौस नायकवाडी आदींनी काम पाहिले. या महिलेला यापूर्वी पुणे आणि हडपसर परिसरात अशाच प्रकारच्या प्रकरणात अटक केल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली आहे. महिलेस मुख्य न्यायदंडाधिकारी भोसले यांच्यासमोर उभे केले असता 14 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.