आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे २५ कोटींचा फटका, मुंबईतील पावसामुळे चार दिवसांत ४० गाड्या रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागील शुक्रवारी मुंबईत जोरदार पाऊस पडला. परिणामी लोकल मुंबई सुटणाऱ्या लांबपल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. चार दिवसांत ४० गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर काही गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांंचे हाल झाले शिवाय मध्य रेल्वे प्रशासनाला चार दिवसात सुमारे २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. सोलापूर रेल्वे विभागावरही याचा परिणाम जाणवला.

शुक्रवारी पावसामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल्स, बांद्रा टर्मिनल्स कुर्ला टर्मिनल्स येथून सुटणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. यात तपोवन , सिंहगड, प्रगती, इंद्रायणी, डेक्कन क्वीन, मुंबई -चैन्नई, मुंबई -भुसावळ, मुंबई -लातुर, मुंबई -बेंगळुरु उदयान एक्सप्रेस, विजापूर -मुंबई फास्ट पॅसेजर आदी प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वे प्रशासनाला आरक्षित तिकीट धारकांना ितकिटाच्या रकमेचा संपूर्ण परतावा द्यावा लागला आहे. ही किंमत सुमारे २५ कोटी रुपये आहे. सोलापूर विभागातील इंद्रायणी गाडी रद्द करावी लागली. शिवाय अनेक गाड्या उशिरा धावल्या.

फुकट्या प्रवाशांकडून १८ कोटींची वसुली
मध्यरेल्वेच्या सोलापूर, पुणे, नागपूर, मुंबई भुसावळ या पाचही विभागात मे महिन्यात फुकट्या प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. विनाितकीट प्रवास करणे, चालू तिकीट काढून आरक्षित डब्यातून प्रवास करणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची रेल्वेतून वाहतूक करणे आदी प्रकारात दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून मध्य रेल्वेने १८ कोटी २६ लाख रुपयांची वसुली केली आहे.

प्रवाशांना पैसे द्यावे लागले
पावसामुळेमध्य रेल्वेचे चार दिवस वेळापत्रक बिघडले होते. त्यामुळे जवळपास ४० गाड्या रद्द करण्यात आल्या. यातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रवाशांना परतावा दयावा लागला. सुमारे २५ कोटी रुपयाचा फटका बसल्याचा अंदाज आहे. नरेंद्रपाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.
रेल्वे प्रशासन
बातम्या आणखी आहेत...