आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर शहरात पिस्तुलाच्या बळावर 28 तोळे लुटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पिस्तुलाच्या बळावर 28 तोळे सोने आणि सव्वा लाख रुपये लुटून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 2.45 च्या सुमाराला सोलापूर शहरातील विद्यानगर, शेळगी परिसरात घडली.

निवृत्त अभियंता श्यामराव गाडे हे सोमवारी रात्री घरातील हॉलमध्ये, तर त्यांच्या पत्नी शालिनी आणि दोन मुली बेडरूममध्ये झोपल्या होत्या. मध्यरात्री 2.45 च्या सुमारास दरवाजा तोडल्याचा आवाज ऐकून गाडे जागे होतात..इतक्यात एक चोर गाडेंच्या कपाळावर बंदूक रोखतो, गाडेंचा मोबाइल फेकून देतो...‘गोंधळ केल्यास जागेवरच मारून टाकीन’, अशी धमकी देतो. गोंधळ ऐकून गाडेंच्या पत्नी, दोन मुली बाहेर येतात. चोरट्यांपैकी काही जण त्यांच्या गळ्याला तलवार लावतात. कपाटाच्या किल्ल्यांची मागणी करतात. गाडे कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर लोखंडी रॉडने कपाटाचा लॉक तोडतात आणि कपाटातील 28 तोळे सोने, रोख सव्वा लाख रुपये सोबत आणलेल्या कारमध्ये टाकून पसार होतात. या प्रकरणी श्यामराव गाडे (वय 62) यांनी जोडभावी पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.