आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 29 Candidates Took His Nominations Back In Last One Hour At Solapur, Divya Marathi

शेवटच्या तासाभरात 29 उमेदवारांनी घेतली माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हाधिकारी कार्यालयातील सोलापूर लोकसभा निवडणूक कार्यालयात शेवटच्या तासाभरात 29 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. अर्ज काढून घेण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धावपळ आणि अर्ज न काढण्यासाठी अपक्ष उमेदवारांचा वेळकाढूपणा दिसून आला. मात्र, शेवटच्या तासभरात 27 अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.
सोलापूर लोकसभेसाठी 49 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीमध्ये 4 अर्ज बाद झाले. उर्वरित 45 मध्ये 4 उमेदवार वगळता 41 उमदेवार अपक्ष होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत संजय क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर या दोनच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला होता. दुपारी अडीच वाजता मात्र अर्ज मागे घेणार्‍यांची संख्या वाढली. 10 मिनिटे शिल्लक असताना सिद्धाराम चाकोते राजेंद्र नारायणकर उमेदवारास घेऊन आले तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये नीलेश भंडारे, सचिन आठवले हे उमेदवार अर्ज माघारी घेण्यासाठी दाखल झाले. प्रमोद गायकवाड यांनी अर्ज माघारी घेताना मी आठवले यांचा शब्द पाळणारा कार्यकर्ता असल्याचे व भाजपकडून बोलावणे आल्यास प्रचाराला जाणार असे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील बाजूस वासुदेव इप्पलपल्ली व इतर कार्यकर्ते किती अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, याची माहिती घेत असल्याचे दिसून आले. दरम्यानच्या काळात काही कार्यकर्ते फोनवरून आणखी दोन राहिले, अशी माहिती देत होते. माढा मतदारसंघातून 5 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. यामध्ये धवलसिंह मोहिते यांचाही समावेश होता.
विड्रॉल करणार आहे का ?
काँग्रेसचे कार्यकर्ते मनीष गडदे यांनी तीन वाजण्यास काही सेकंदांचा कालावधी असताना प्रवेशद्वारासमोर येत मोठय़ा आवाजामध्ये विड्रॉल कोण करणारे आहेत का ? अशी जाहीर विचारणा केली तेव्हा नगरसेवक आठवले दोन उमेदवारांना हाताला धरून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी घेऊन गेल्याचे दिसले. सिद्धाराम चाकोते यांनीही अपक्षांची मनधरणी करीत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचविले.