आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरातील २९८ प्रार्थनास्थळे अवैधच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने शहरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांचे सर्वेक्षण केले. शहरात १६७३ अनधिकृत प्रार्थनास्थळे आढळून आली. त्यापैकी २९८ विविध धर्मीय प्रार्थनास्थळे पाडावीच लागतील. १२३७ नियमित करता येतील तर १३८ प्रार्थनास्थळे स्थलांतरित करता येतील, अशा आशयाचा अहवाल महापालिका नगरअभियंता विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास दिला आहे. बुधवारी हा अहवाल जिल्हाधिका-यांनामिळेल. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभर प्रार्थनास्थळांचे सर्वेक्षण करून बेकायदा प्रार्थनास्थळांवर कारवाई केली जात आहे.
शहरात सर्वाधिक अनधिकृत ३०५ प्रार्थनास्थळे झोन क्रमांक पाच मध्ये तर झोन क्रमांक चारमध्ये सर्वाधिक कमी ७४ इतकी आहेत. २९८ प्रार्थना स्थळे नियमित करता येत नाहीत. त्यामुळे ते पाडण्यायोग्य असल्याचे अहवालात नमूद केलेले आहे. सर्वाधिक स्थळे झोन क्रमांक एक मध्ये आहे. झोन क्रमांक सहामध्ये एकही अनाधिकृत प्रार्थनास्थळ नाही. झोन निहाय अनधिकृत प्रार्थनास्थळे (कंसात पाडण्या योग्यस्थळे) झोन क्र. - १४२ (४१) झोन क्र.२ - ३०५ (३०) झोन क्र. - १६३ (८४) झोन क्र. - ७४ (३३) झोन क्र. - ३११ (२) झोन क्र.६ - २०३ (नाही) झोन क्र. - २२५ (९४) झोन क्र. - २५० (१४)