आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोर, पोलिस आणि बॅण्डबाजा, एसीपीच्या घरात 3.5 लाखांची चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील चोरीच्या घटनांचे आणि चोरांच्या विविध किश्श्यांचे कवित्व संपायला तयार नाही. नेहमीच्या घटनांमुळेही चोरांबाबत पोलिसांना काहीच वाटत नाही. चोरटे बिनधास्त चोरी करत फिरतात.
नागरिक मात्र धास्तावलेत. राजकीय लोकप्रतिनिधी मात्र चांगला पोलिस प्रमुख आणू म्हणून नुसत्या बाताच मारत फिरतात. काही असो शहरात आज घडलेल्या घटनांवर असे म्हणता येईल की, ‘बॅण्डबाजा, चोर आणि पोलिस’.

चोरांच्या कचाट्यातून पोलिस अधिकारी-कर्मचारी सुटेनासे झाले आहेत. शहरात घरफोड्या, चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे पोलिसांना अद्याप शक्य झालेले नाही.
घटना दुसरी : बिअर शॉपी फोडताना तिघे तरुण जाळ्यात, मरिआई चौकातील घटना
मरिआई चौकातील आकाश बिअर शॉपीत चोरी करताना तिघांना पोलिसांनी पकडले. रविवारी पहाटे तीनच्या सुमाराला हा प्रकार घडला. राहुल भंडारे (वय १९, रा. फॉरेस्ट कोनापुरे चाळ), हणमंत लक्ष्मण केंचनाळकर (वय २३, रा. इरण्णा वस्ती, ग्रीन गोडावूनजवळ, सोलापूर), आनंद उर्फ सिंगम अशोक जाधव (वय ३४, रा. चव्हाण वस्ती, सेटलमेंट कॉलनी सहा) यांना अटक झाली आहे. सूरजकुमार जाधव (रा. सेटलमेंट कॉलनी सहा) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंखे त्यांचे पथक रात्रगस्त देताना बिअर शॉपीचे शटर उचकटल्याचे लक्षात आले. संशयावरून दुकानात जाऊन पाहणी केल्यानंतर तिघेजण बिअरच्या बाटल्या पिशवीत ठेवत होते. त्यांना जागेवरच पकडले. तिघांपैकी दोघांना सदर बझार पोलिसांनी विविध चार गुन्ह्यांत अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.
घटना तिसरी : बॅण्डबाजाचे साहित्य पळविले

पुण्यात साहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झालेले काशिनाथ उंबरजे यांच्या घरातून साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. सव्वालाख किमतीचा टीव्ही, अडीच किलो चांदी, साहित्य, अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण, पंचवीस हजारांच्या रेशमी साड्या, पंचवीस हजार रुपये रोख असा ऐवज आहे. विजापूर रस्त्यावरील जय जलाराम नगरमध्ये घर आहे. शनिवारी सकाळी त्यांचे घर फोडले होते. रविवारी ते सोलापुरात आल्यानंतर विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली.
जुना बोरामणी नाका परिसरातील फेमस स्टार बँजोचे साहित्य चोरांनी पळविले. सुमारे दीड लाखाचा ऐवज आहे. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. जोडभावी पोलिसात आनंद रणदिवे यांनी फिर्याद दिली. टेम्पोत बँजोसाठी लागणारे साहित्य होते. टेम्पोची काच फोडून त्यातील साहित्य पळवले. ढोलकी, पियानो, ताशे, संगीत संच, आदीचा समावेश त्यात आहे. अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप अटक झालेली नाही.