आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती घोटाळा, ५४ पैकी तिघेच अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोहोळ तालुक्यातील वाफळे येथून समोर आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे. अपहाराची रक्कम कोटी ६३ लाख रुपयांवर पोहचली आहे. आरोपींची संख्या ३४ वरून ५४ वर पोहचली आहे. मात्र आतापर्यंत केवळ तिघांनाच अटक झाली आहे.
६५ बोगस विद्यार्थ्यांची यादीही पोलिसांच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण कार्यालयाने मागील तीन वर्षात महाविद्यालयनिहाय शिष्यवृत्ती दिलेल्या विद्यार्थ्यांची यादीच पोलिसांना सादर केली आहे.

वाफळे येथील कोणतेही शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर ६० हजारांची शिष्यवृत्ती जमा झाल्याने हा घोटाळा उघडकीस आला. पहिल्या टप्प्यात सारिका काळे, अमीर तांबोळी यांच्यासह ३४ जणांवर गुन्हे दाखल केले. प्रमुख तीन आरोपी वगळता इतर आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर केली नाहीत.

मास्केट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच हा घोटाळा केल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले असून सारिका काळे, अमीर तांबोळी हे सूत्रधार असल्याचे तपासातून समोर येत आहे. मात्र या प्रकरणामागील मास्टरमाइंड कोण? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिला आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना कोट्यवधीचा घोटाळा करण्याचे धाडस आले कोठून ? याचा सूत्रधार शोधणे पोलिसांसमोर आव्हान राहणार आहे.

पोलिसांनी मागितलेली पूर्ण माहिती सादर केली आहे. यामध्ये मागील तीन वर्षात किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे, याची माहिती उपलब्ध केली. यापुढेही तपासासाठी सहकार्य राहील. मनीषा फुले, सहाय्यक आयुक्त
बातम्या आणखी आहेत...