आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांत 30 मिमी पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शनिवारी सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने मंगळवारी शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावली. सलग चार दिवसांत शहरात 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

मंगळवारी दुपारी ढग जमा झाले आणि तीन वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सरी कोसळतच होत्या. शाळा सुटण्याच्या वेळी संततधार लागल्याने शालेय मुले आणि पालकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणी साचले. येत्या 48 तासांत ढगाळ वातावरण राहील व काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.