आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3000 Student Demand Exam Answer Sheet Photocopy Solapur

3000 विद्यार्थ्यांना हवीय उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभाग सध्या विविध उत्तरपत्रिकांचे झेरॉक्स काढण्यातच मग्न आहे. तब्बल 4,800 विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी अर्ज केला आहे. यात 3000 विद्यार्थी अभियांत्रिकीचे आहेत. विद्यापीठाने आतापर्यंत 2662 उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून विद्यार्थ्यांना झेरॉक्स प्रत उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ही सेवा युद्धपातळीवर देण्यात येत आहे. मात्र फोटोकॉपीच्या वाढती मागणी पाहता विद्यार्थ्यांचा परीक्षण यंत्रणेवरील विश्वास काहीसा डळमळीत असल्याचे अधोरेखीत होत आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा कल फोटोकॉपी घेण्याकडे जास्त असल्याचे दिसून येईल.

अशी होते पुनर्तपासणी
यानंतर रिचेकिंग (गुणपडताळणी)आणि रिव्हॅल्यूएशन (उत्तरपत्रिका पुनर्तपासणी)असे दोन टप्पे असतात. रिव्हॅल्यूएशनमध्ये संपूर्ण उत्तरपत्रिकांवर पूर्वीच मिळालेले गुण पूर्णत: झाकून , उत्तरपत्रिकांवरील क्रमांकही बदलला जातो. यानंतर विद्यापीठ नियुक्त तज्ज्ञ प्राध्यापक उत्तरपत्रिका नव्याने तपासतात. गुणांमध्ये दहा टक्केपेक्षा जास्त फरक पडत असेल तर उत्तरपत्रिका तज्ज्ञ समितीला सोपवली जाते. या समितीकडून पुन्हा तपासणी होते व अंतिमत: विद्यार्थ्यांना बदल झालेले गुण प्रदान केले जातात.

केवळ अभियांत्रिकीच नव्हे तर बी.कॉम, बी.सी.ए, बी.बी.ए. , एमबीए, एमसीए, एम.फार्मा अशा विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थीही फोटोकॉपी मागवितात.

दोन सत्रात परीक्षा
सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभाग दोन सत्रात परीक्षा घेते. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फोटोकॉपीची सुविधा विद्यापीठाने दिली आहे. या सुविधेचा लाभ अनेक विद्यार्थी घेतात. फोटोकॉपी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नजरेत त्या तपासणीतील काही त्रुटी आढळल्या तर विद्यार्थी विद्यापीठाकडे रिव्हॅल्यूएशन किंवा रिचेकिंगसाठी शुल्क भरून अर्ज करतो. सामान्यत: फोटोकॉपीसाठी अर्ज केलेले 25 टक्के विद्यार्थी असे अर्ज करतात. म्हणजे परीक्षा विभाग या उत्तरपत्रिकांचे पुनर्तपासणी करते, असे परीक्षा नियंत्रक डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी सांगितले.