आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठात 31 सीसीटीव्ही कॅमेरे सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रात (कॅप) 23 सीसीटीव्ही (क्लोज सर्किट) कॅमेरे बसविण्यात आले असून 8 कॅमेरे मुख्य कार्यालयात आहेत. यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च आला.

परीक्षा नियंत्रक डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, विभागाचे कामकाज सुरळीत पार पडण्याला मोठी मदत मिळते आहे. यापुढे महाविद्यालयातील केंद्रात कॅमेरे बसविण्याची सूचना देण्यात येणार आहे. प्रo्नपत्रिका, उत्तरपत्रिका असलेल्या ठिकाणी कॅमेरे लावणे अनिवार्य असणार आहे. कॅमेरे नेटवर्कने जोडण्यात येतील. त्यातून परीक्षा नियंत्रकासाठी कोणत्याही परीक्षा केंद्रात प्रत्यक्ष नियंत्रण वा सूचना देण्यात सुकरता प्राप्त होईल.