आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कुबूल किया उसको और उसके महेर को...', ३४ जोडपी बंधनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- 'कुबूल किया उसको और उसके महेर को...' असे म्हणत ३४ जोडपी शुक्रवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास मोठ्या थाटात विवाहबद्ध झाली. यावेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. लग्नविधी शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी पार पाडली.
व्हिक्टर यूथ फेडरेशन सोलापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पानगल हायस्कूलच्या पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी वाजता सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे १२ वे वर्ष आहे.

या विवाह सोहळ्यासाठी गेल्या आठवडाभरापासून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते झटत होते. नियोजनाप्रमाणे वाटून दिलेली सर्व जबाबदारी प्रत्येकजण प्रामाणिकपणे पार पाडत होते. विवाहसोहळ्याच्या दिवशी सकाळपासून पानगल प्रशालेच्या पटांगणावर एकच गर्दी होती.
भव्य स्टेज, हजारो जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. वधूंना सजवण्याकरिता नातेवाईक रमले होते. वधू-वरांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचा आनंद दिसत होता. मित्रकंपनी आपापल्या मोबाइलमध्ये हा सोहळा टिपत होते. सायंकाळी पावसाच्या रिमझिम झरी आल्या आणि सर्वांची एकच पळापळ झाली. पाच मिनिटानंतर पाऊस थांबला.

यांनी घेतले परिश्रम : विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी अ.सत्तार नदाफ, मकसुद शेख, बखत्यार सय्यद, म.शकील बागवान, रियाज शाहजी, जावेद काझी, अय्युब नल्लामंदू, ईस्माईल शेख, रफिक कोसगी, जाकीर शेख, साजीद शेख, कादर शेख, सलीम मुजावर, कय्युम, सादिक रायचुरे, फेरोज बागवान, इम्तियाज कमिशनर, इब्राहिम सालार, युसूफ कुरेशी, शोएब चौधरी, जावीद बागवान, मुबीन सय्यद, समीर जमादार, मुजमील तांबोळी, मुस्ताक कुरेशी, नसीम शेख, अबुबकर आदींनी परिश्रम घेतले.


विजापूर, गुलबर्गा येथून नोंदणी
या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी दोन महिन्यापासून नोंदणी करून घेण्यात आली होती. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पहिल्या वर्षी फक्त जणांनी नोंदी केल्या होत्या. यंदा १२ व्या वर्षी ३४ जणांनी नोंदी केल्या. यामध्ये सोलापूरसह मुंबई, पुणे, लातूर, नातेपुते, इंडी, विजापूर, गुलबर्गा आदी भागातील जोडप्यांचा समावेश होता.
वधू‑वरांना भेट : वधू-वरांना इस्लामिक पद्धतीने पोषाख, संसारोपयोगी वस्तू, पलंग सेट, वधू-वरांकडील प्रत्येकी १०० नातेवाइकांना जेवण देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...