आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकरात्मक बातमी: अरुण रोडगेंच्या शेतात जुगार खेळताना ३४ जणांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरपासून जवळ असलेल्या मार्डी गावात अगदी हायप्रोफाइल सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून अरुण प्रभाकर रोडगेसह ३४ जणांना अटक केली. आतापर्यंतच्या कारवाईतील ही मोठी घटना आहे. सुमारे सतरा लाख रुपये रोख, सात चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने असा पाऊण कोटीचा ऐवज जप्त केला आहे.
गाणगापूर, तुळजापूर, सोलापूर, गुलबर्गा, मार्डी, अक्कलकोट गावातील चौतीस लोकांना अटक झाली आहे. ही कारवाई रविवारी पहाटे दोनच्या सुमाराला रोडगे यांच्या शेतातील वस्तीवर झाली. रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत हा जुगार अड्डा चालत होता. ही माहिती मिळाल्यानुसार कारवाई केल्याचे सहायक पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद ठेवण्यासाठी खास पथके नेमली आहेत. मार्डीत जुगार सुरू असल्याची माहिती श्री. उपाध्याय यांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे एका पथकाने कारवाई केली. त्यावेळी पैशाचा ढीग पडला होता. बाहेर महागड्या गाड्या थांबल्या होत्या.
या पथकाची कारवाई
सहायक निरीक्षक इंद्रजित सोनकांबळे, सहायक फौजदार गवी, रियाज शेख, मिलिंद कांबळे, विजयकुमार कोरे, मुल्ला, मियॉवाले, मंगेश बोधले, शंकर बांगर, बापूसाहेब मोरे, अमृत खेडकर, सुभाष दासरे, विनोद साठे, विठ्ठल पठाडे, सिकंदर मुल्ला या पथकाने कारवाई केली.

ही वाहने जप्त : कार- एमएच १२ जेयू ९०९८, एमएच १३ एव्ही ९१९९, एमएच ४६ पी ४१९६, एमएच २५ आर ५३३१, एमएच १३ बीएन १८१९, एमएच १० बीए ७८०८, एमएच १३ एसी २२१३ या सात चार चाकींसह सहा दुचाकी जप्त.
अटक झालेल्यांची नावे याप्रमाणे
अरुण रोडगे (सोलापूर), राहुल चिंचोळी (वय २३, गाणगापूर), प्रभाकर जाधव (वय ४५, सोलापूर), रशीद शेख (४८, रा. घोंगडे गल्ली), सुनील पवार (वय ४८, मार्डी), नारायण गवळी (४३, रा. तुळजापूर), जब्बार बोराडे (वय २२, मार्डी), राजू माने (वय३६, रा. गुलबर्गा), हनुमानदास पुजारी (रा. हैदराबाद), रमेश जगताप (३९, रा. एम. जी. रोड, विजापूर), सूर्यनारायण माने (२९, रा. भवानीपेठ), प्रकाश साठे (दमाणीनगर), पोपट कदम (वय ४०, तुळजापूर), किरण फुटाणे (भोसले चौक, पंढरपूर), प्रदीप माने (मुरारजीपेठ), विकी मुलतानी (मोहोळ), विकास रेळेकर (पश्चिम मंग़ळवार पेठ), सुरेश मादास (दत्तपूूजानगर, सोलापूर), प्रभाकर जाधव (संतोषनगर, बाळे), लिंगप्पा केमशेट्टी (तडवळ), किरण चिनकेरी (शिवगंगा मंदिरजवळ, सोलापूर), समर्थ माने (कैकाडी गल्ली, उत्तर सोलापूर), संतोष जाधव (बाळे), सचिन हवीले (शाहीर वस्ती), हर्षवर्धन निंबाळकर (रविवारपेठ), महांतेश हाडगीळ (गुलबर्गा), आकाश बोराडे (मार्डी), रामला शेरला (सोलापूर), चंद्गकांत देशमुख (उत्तर कसबा), बंदेनवाज कुरेशी (रा. भवानीपेठ), अमित आरोरा (आकोला), धीरज हिप्परगी (मार्डी), राहुल बाललीगल (गुरुवारपेठ), सिद्धाराम माळी (तडवळ) यांना अटक झाली आहे. दुपारी न्यायालयात हजर केल्यानंंतर त्यांना जामीन मिळाला.
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत
- जिल्ह्यातील अवैध धंदे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. पोलिस निरीक्षक दररोज काय कारवाई करतात याची माहिती मी व्हॉट्सअॅपवर मागवितो. तसा पोलिस अधिकाऱ्यांचा ग्रुप तयार केलेला आहे. एका महिन्यात हे प्रकार थांबलेच पाहिजेत. मी नगरला असताना बारा लाखांची जुगार रेड केली होती. आज सतरा लाखांची रेड झाली. ही मोठी कारवाई आहे. शहरातील अनेकजण जिल्ह्यात येऊन अवैध धंदे करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यादृष्टीने माहिती घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. यापुढेही कारवाई होत राहील.”
वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक
बातम्या आणखी आहेत...