आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार : बँकिंग क्षेत्रात 35 हजार नोकर्‍यांची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - देशातल्या 19 राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 25 हजार जागा भरण्यात येत आहेत. तसेच, ग्रामीण बँका 5 हजार जागा भरणार आहे. विमा क्षेत्र, पोलिस आणि गुप्तवार्ता विभागामध्येही मोठी भरती आहे. बेरोजगार युवकांना संधी खुणावत आहे. विविध क्षेत्रांत सुमारे 50 हजार जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये या संदर्भात जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सीमा सुरक्षा दलात 645 जागा, तर जिल्हा न्यायालयांत 4 हजार 447 रिक्त जागा भरण्याची मोहीम सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या. इच्छुकांच्या कौशल्यांची कसोटी पणाला लागणार असून, त्यासाठी विशेष मार्गदर्शन करणारे वर्गही सुरू झाले आहेत.

एकाच दिवशी परीक्षेमुळे गोंधळ
धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी, लेखापाल, शिरस्तेदार, न्याय लिपिक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी 28 जुलैला त्याच्या परीक्षा होणार आहेत. त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधीक्षक, सामान्य राज्य सेवा गट ब या पदाच्या परीक्षा ठेवल्या आहेत. उभयतांकडून घेतल्या जाणार्‍या परीक्षांच्या वेळाही सारख्याच आहेत. सकाळी साडेदहा ते दुपारी एकपर्यंत या परीक्षा होतील. त्यामुळे या पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांसमोर मोठी अडचण निर्माण झाली. दोन्ही परीक्षा सोलापूरसह मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, लातूर आणि कोल्हापूरच्या केंद्रांवर होणार आहेत.


महिला बँकांमुळे युवतींना मोठी संधी
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारी महिला बँकेची घोषणा केली होती. देशाच्या प्रमुख शहरांमध्ये या बँकेच्या शाखा सुरू होतील. विशेष म्हणजे या बँकांच्या संचालकांसह अधिकारी व कर्मचारी या महिलाच असणार आहेत. त्यासाठी पहिल्याच टप्प्यात लाखभर नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. युवतींना उज्‍जवल भविष्य असून, इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू करावी. आनंद जोशी, टाइम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक