आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

६५ एकरांवर वीज, पाणी सुविधांसह वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- आषाढी यात्रेपूर्वी विष्णूपद मंदिराच्या खालील बाजूच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण केले जाईल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आषाढी यात्रेच्या काळातही चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांना तंबू, राहुट्या, मांडव उभारू दिले जाणार नाहीत. त्यामुळे नदीपात्रातील जुन्या दगडी पुलाजवळील ६५ एकर जागेत प्रत्येकी तीन हजार चौरस फुटांचे ३५० प्लॉट तयार करून तेथे वीज, पाणी या सुविधांसह वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करू, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली. शासनाच्या विविध योजनांमधून शहरात सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मुंढे हे शुक्रवारी (दि. २९) येथे आले होते. या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जुन्या दगडी पुलाजवळील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्याला जोडणाऱ्या बैलगोठ्याच्या इमारतीच्या बाजूच्या रस्त्याचे काम अर्धवट आहे. ते कामही यात्रेपूर्वी पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
निर्जला एकादशीनिमित्त शुक्रवारी (दि. २९) येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चंद्रभागेच्या वाळवंटात पुरेसे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे स्नानाची चांगली सोय झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. न्यायालयाच्या निर्देशानंतरही चंद्रभागा वाळवंट स्वच्छ प्रदूषणमुक्त राखण्याविषयी प्रशासन ढिम्म असल्याचेच दिसले. एकादशी असूनही वाळवंटात सर्वत्र कमालीची अस्वच्छता होती. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर गजबजला होता.
उन्हाळ्याच्या सुटीमुळे निर्जला एकादशीला श्री विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. गुरुवारी (दि. २८) सायंकाळपासूनच भाविक रेल्वे, एसटी खासगी गाड्यांनी येथे येत होते. एकादशीनिमित्त पहाटेपासून चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी वाळवंटात गर्दी केली होती. मात्र, भाविकांच्या सोईसाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांविषयी प्रशासनाला सोयरसुतक नसल्याचे दिसले.
नुकतेच उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी चंद्रभागा नदीचे प्रदूषण स्वच्छतेविषयी काही निर्देश दिले. त्यानुसार चंद्रभागा वाळवंटात प्रशासनाकडून फक्त भाविकांच्या माहितीसाठी लावलेले फलक िदसले. परंतु प्रत्यक्षात प्रशासनाला अद्याप न्यायालयाच्या निर्देशांबाबत फारसे गांभीर्य असल्याचे दिसत नाही.
दरम्यान, विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची गर्दी होती. चंद्रभागा स्नानानंतर दिंड्यांद्वारे नगरप्रदक्षिणा केली. सफाईअभावी वाळवंटामध्ये सगळीकडे पत्रावळी, उष्टे अन्न, केळींच्या साली, निर्माल्य, नारळाची केसरे, चिंध्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. वाहने वाळवंटात जाऊ नये म्हणून उभारलेल्या बॅरेकेडिंगमधून भाविक दुचाकी वाहने पात्रापर्यंत नेत होते. त्यामुळे चंद्रभागेचे पात्र स्वच्छ राखण्याची मागणी होत आहे.
मुढे म्हणतात...
पालखी तळांच्या जागेत कोणतेही बदल नाहीत
आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाची सोय
विठ्ठलाच्या दर्शनासाठी कमी कालावधी लागावा यासाठी आराखड्याचे काम सुरू
शहरातील आठ रस्त्यांसाठी नगरोत्थान योजनेतून ५७ कोटी रुपये मंजूर
यात्रेपूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करणार, वाळू माफियांची गय नाही
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...भाविकांची गर्दी, वाळवंटात अस्वच्छता...
बातम्या आणखी आहेत...