आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारीसाठी राज्यभरातून एसटीच्या 3500 बस धावणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जय्यत तयारी केली असून एकादशी यात्रा काळात राज्यभरातून 3500 बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पंढरपूरसाठी सोलापूर विभागातून 175 एसटी सोडण्यात येणार आहेत.

आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात विठू भक्तांचा मेळा भरतो. दरवर्षी भक्तांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता एसटी प्रशासनाने मागील वर्षीच्या तुलनेने 200 गाड्या जास्त सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी राज्यातून 3300 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. सोलापूर आगारातूनही यंदाच्या वर्षी गाड्यांच्या संख्येत वाढ झालेली पाहावयास मिळते. मागील वर्षी सोलापूर विभागातून 159 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदा 175 गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे भक्तांची चांगली सोय होणार आहे.

भीमा यात्रा स्थानक हे स्थानक पंढरपूर - मोहोळ रस्त्यावरील विसावा गणपती येथे उभारण्यात येत आहे. येथे नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आदी प्रवाशांसाठी गाड्या उभारतील. क्षमता 2600 गाड्यांची आहे.

तीन तात्पुरत्या स्थानकाची निर्मिती
दरवर्षी आषाढी एकादशी यात्रा काळात एसटीला पंढरपुरात थेट प्रवेश बंद असतो. प्रवाशांची गैरसोय होऊ नये व वाहतुकीला त्रास निर्माण होऊ नये म्हणून एसटी प्रशासनाच्या वतीने पंढरपुरात मोकळय़ा जागेत तात्पुरत्या स्थानकाची निर्मिती करण्यात येते. यंदा तीन स्थानके उभारण्यात येणार आहेत.

दररोजच्या एसटी मंगळवेढामार्गे
यात्रा काळात दररोज वेळापत्रकाप्रमाणे धावणार्‍या एसटीच्या (टायमिंग गाड्या) वेळेवर परिणाम होऊ नये म्हणून दररोज धावणार्‍या प्रशासनाने पंढरपूर मार्गेऐवजी मंगळवेढा मार्गे धावणार आहेत. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर येथून सोलापूरकड जाणार्‍या गाड्यांचा समावेश आहे.

दोन दिवसांत आढावा बैठक घेणार
यात्राकाळात भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या दोन दिवसांत सोलापुरात यात्रा संबंधीचा आढावा घेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बैठक होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांची उपस्थिती राहील. जीवनराव गोरे , अध्यक्ष, राज्य परिवहन महामंडळ.

चंद्रभागा यात्रा स्थानक याठिकाणी मुंबई व पुणे येथील गाड्या उभ्या राहतील. 900 गाड्यांची क्षमता आहे.

कोर्टाशेजारील स्थानक पंढरपुरातील न्यायालयाच्या परिसरातील मोकळ्या जागेत हे स्थानक उभारण्यात येईल. या ठिकाणी मंगळवेढा, सांगोला येथील एसटी थांबतील.