आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३८८ कोटींचा विकास आराखडा, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - २०१५-१६या वर्षाच्या ३८८ कोटी ७० लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्यास जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजनांसाठी २६१ कोटी लाख, अनुसूचित जाती उपयोजनांसाठी १२३ कोटी २२ लाख अदिवासी विकास योजनांसाठी कोटी ४२ लाख रुपयांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड, सुरेश हसापुरे यांनी सर्वसाधारण नियोजनामध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी रस्ते लघु पाटबंधारे यासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली. यामुळे ४० कोटी रुपये अतिरिक्त निधी मिळण्याचा ठराव सभागृहाने केला.

जानेवारीअखेरपर्यंत १४१ कोटी खर्च
२०१४-१५या आर्थिक वर्षामध्ये विविध विकासकामांना ३९१ कोटी ६४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद होती. यापैकी शासनाकडून ३८६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. फेब्रुवारी रोजी १०८ कोटी ३६ लाख १४ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

गतवर्षीपेक्षा कोटी १२ लाखांची वाढ
२०१४-१५या वर्षासाठी नियोजन समितीकडून ३८० कोटी ५८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. २०१५-१६ साठी ३८८ कोटी ७० लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये मागील वर्षीपेक्षा फक्त कोटी १२ लाख रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे.

११५ कोटी खर्च नव्हे ती विविध विभागाची मागणी
जिल्हानियोजन बैठकीत आमदार गणपतराव देशमुख यांनी समाजकल्याण विभागाकडील निधीवरून अधिका-यांना धारेवर धरले होते. मात्र समिती सदस्यांना देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये १०१ कोटीपैकी खर्च निधी विविध विभागांकडून मागणी केलेला ११५ कोटी रूपये असा उल्लेख असल्याचे समाजकल्याण आयुक्त मनीषा फुले यांनी सांगितले. मात्र आमदार देशमुख यांनी मागणी असलेला ११५ कोटींचा निधी अपेक्षित खर्च आहे, असे दिसून आल्याने गोंधळ उडाला.

३७.६९ कोटी रुपयांचे पुनर्नियोजन
चालुवर्षामध्ये ३७ कोटी ६९ लाख १६ हजारांचा निधी खर्च होत नसल्याचे विविध कार्यालयांनी कळविले आहे. या निधीचे पुनर्नियोजन करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण योजनांमधील गाभा क्षेत्रातील कृषी संलग्न सेवा, ग्राम विकास सामाजिक सेवा विभागांकडून २१ कोटी ९७ लाख ५७ हजार तर बिगर गाभा क्षेत्रातील पाटबंधारे, उद्योग खाण आदी विभागांकडून कोटी ८६ लाखांचा निधी खर्च होणार नसल्याचे कळविले आहे.