आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3d Speech By Modi Issue At Solapur, Divya Marathi

थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे पंढरपूरकरांना भेटले मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी पंढरपुरात शुक्रवारी मोठी गर्दी झाली. मोदी आले. त्यांनी पंढरपूरवासीयांना भेटले. आपल्या भाषणाने र्शोत्यांना आपलेसेही केले. पण, हे सारे केले ते अत्याधुनिक थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे. देशातील शंभर शहरांमध्ये एकाच वेळी सभा घेण्याची किमया या तंत्राने साधली गेली.
गेल्या साठ वर्षांत देशवासीयांनी काँग्रेसला ताकद दिली. मात्र, ते देशाचा सर्वांगीण विकास करण्यात कमी पडले. विकासाऐवजी त्यांनी भ्रष्टाचार, सांप्रदायिकतेला प्रोत्साहन दिल्याने देशाची अधोगती झाली. त्यामुळे जनता काँग्रेसला कंटाळली आहे, हे सुरुवातीच्या तीन टप्प्यांतील मतदानाच्या आकडेवारीवरून दिसते. कॉंग्रेस नामशेष होणे आता ठरलेलेच आहे, असा घणाघात मोदी यांनी केला.
मोदी म्हणाले, ‘काँग्रेसमुळे देशासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कुपोषण, ग्रामीण आरोग्याचे प्रo्न गंभीर आहेत. परिणामी बालकांना, गर्भवती मातांना जीव गमवावा लागत आहे. महिला, मुलीही असुरक्षित आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचा दाम मिळत नाही. पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी मिळू शकतात. मात्र काँग्रेसने त्याचा विकास केला नाही. यामुळे मतदारांसह विशेषत: युवक जागरूक झाला आहे. तरुणाईच्या सोशल साईट्सवरील सत्ताधार्‍यांच्या विरोधातील कॉमेंट्सही अफलातून आहेत.’
सत्ताधार्‍यांकडून भाजप व मित्रपक्षांवर टीकेची झोड उठवली जात असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘विरोधक जेवढी टीका करतील तेवढय़ाच ताकदीने निवडणूक निकालानंतर आमचे कमळ फुलून येईल. आम्हाला देशातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास साधावयाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने भाजपच्या साथीने एक पाऊल पुढे टाकल्यास देशातील 125 करोड जनतेची पावले विकासाच्या दिशेने पुढे पडतील. त्यातून निश्चितपणे एक प्रगत आणि बलशाली भारताची निर्मिती होईल.’
मोदींसमोरच असल्याचा भास
टिळक स्मारक मंदिराच्या मैदानावर या सभेचे आयोजन केले होते. थ्रीडीमुळे याठिकाणीच ही सभा होत असल्याचा भास होत होता. मोदी यांनी उपस्थितांना दोन्ही हात वर करून भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणा देण्याचे आवाहन केले. त्याला लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला. भाजपचे शहराध्यक्ष बादलसिंह ठाकूर, दत्तासिंह रजपूत, शकुंतला नडगिरेसह पदाधिकारी उपस्थित होते.