आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुळेगाव तांडा परिसरातील चाळीस हातभट्ट्या उद्ध्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील दारूभट्यांवर बुधवारी पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी दारू तयार करण्यासाठी तब्बल चारशेपेक्षा जास्त टन लाकूड जाळण्यासाठी जमा केल्याचे उघडकीस आले. तसेच, लाकूड कापण्यासाठी त्या ठिकाणी पाच अनधिकृत आरा गिरण्या सुरू असल्याचे दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या त्या प्रकाराकडे पोलिसांप्रमाणेच वनविभागानेही ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केल्याची चर्चा घटनास्थळी होती. आरा गिरण्यांचे काही साहित्य वन विभागाने ताब्यात घेतले. पण सर्व गिरण्यांचे साहित्य उचलून आणण्याकडे दुर्लक्ष केले.
सोलापूर मुळेगावपरिसर, बक्षी हिप्परगा तांडा परिसरातील सुमारे चाळीस हातभट्टी दारू अड्डे पोलिसांनी बुधवारी उद्ध्वस्त केले. सुमारे दीड कोटीचा ऐवज नष्ट करण्यात आला आहे. यात गूळ मिश्रित रसायन, काळागूळ, प्लास्टिक टाक्या, बॅरेल असे साहित्य होते. तीन जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून रसायन त्यात टाकण्यात आले. बॅरेल, टाक्या फोडण्यात आल्या.
अलीकडील काळातील ही मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळी सहाला सुरू झालेली ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरूच होती. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह पर्यावरण विभाग, वीजवितरण विभाग, प्रदूषण नियमन मंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, उपप्रादेशीक परिवहन विभागाचे अधिकारी यात सहभाग झाले होते. सुमारे पाचशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा या कारवाईत होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अनधिकृत लाकडांचा खच, गुन्ह्याचे कोणते कलम आहेत...