आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात 400 वर्षांपूर्वीची पुरातन तलवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून सर्वत्र श्री खंडोबा नवरात्रास सुरवात होते. बाळ्यातील पुरातन मंदिरातही घटस्थापनेने यात्रेला सुरवात झाली. सुमारे 400 वर्षांपूर्वीची 35 किलो वजनाची पंचधातूंची तलवार या मंदिरात असून उत्सवकाळात पूजनासाठी बाहेर काढण्यात येते. र्शीक्षेत्र जेजुरीगडावर 40 किलोंचा खड्ग आहे, हुबेहूब त्यासारखीच बाळ्याच्या मंदिरातील तलवार आहे.
खंडोबा नवरात्र किंवा चंपाषष्ठी उत्सव नावाने या उत्सवास मार्गशीर्ष प्रतिपदेला प्रारंभ होतो. बाळे येथील मंदिरही हा उत्सव हर्षोल्हासाने साजरा करतो. मंदिरात जागरण गोंधळ, वारू नाचवणे, लंगर तोडणे आदी धार्मिक कार्यक्रम होतात. तसेच खड्ग पूजन हा विधीही होतो. उत्सवकाळात पुरातन तलवारीस र्शींच्या शयनगृहातील पलंग महालात ठेवण्यात येते. र्शींचे युद्धातील शस्त्र या भावनेने तिची जपणूक करण्यात येऊन पूजन करण्यात येते. र्शीक्षेत्र जेजुरीत दसरा महोत्सवाच्या वेळेस या तलवारीचा ‘र्मदानी दसरा’ हा तलवार पेलण्याचा कार्यक्रम होत असतो. सोलापुरात असा कार्यक्रम होत नसला तरी ही पुरातन तलवार दर्शनासाठी उपलब्ध असते हे याचे वैशिष्ट्य.
पुढील स्लाइडमध्ये, ही आहे आख्यायिका