आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरकरांसाठी सोमवार ठरला ;हॉट डे' पा-याने ओलांडली ४१ शी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागील आठवडा ढगाळ वातावारणामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका मिळालेल्या सोलापूरकरांसाठी सोमवार ‘हॉट डे’ ठरला. मागील आठवडाभर ३९ अंश सेल्सिअसपर्यंत असलेला पारा सोमवारी तब्बल ४१.३ अंश सेल्सिअसवर पोहोचला.
दिवसभर उन्हाचे चटके उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. मंगळवरच्या अक्षय्यतृतीया सणाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना उन्हाचा चांगला तडाखा बसला. शुक्रवारी तापमान ३२ अंशापर्यंत कमी झाले होते. रविवारी पारा ४०.८ अंशापर्यंत पोहोचला होता.