आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 45 Percent Of Adhar '; Difficult Marathon Last March

अद्याप 45 टक्क्यांना ‘आधार’; मार्चअखेरचे मॅरेथॉन महाकठीण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-जिल्ह्यातील फक्त 45 टक्के लोकांकडेच आधार कार्ड आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान मिळण्यासाठी बँक खाते व आधार क्रमांक जोडण्याची मुदत 31 मार्च आहे. त्यामुळे आधार नोंदणीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. येत्या दोन महिन्यांत उरलेल्या 55 टक्के लोकांना आधार कार्ड तयार करून देण्याची जणू मॅरेथान स्पर्धा प्रशासनाने केली तरीही मुदतीत सर्वांना कार्ड मिळणे अवघड दिसत आहे.

शहर-जिल्ह्यात पाच लाख 25 हजार गॅस ग्राहक असून, यापैकी अंदाजे दीड लाख नागरिकांकडे आधार क्रमांक आहे. मात्र, उर्वरित चार लाख लोकांकडे आधार कार्ड नसल्याने 30 मार्चपर्यंत आधार क्रमांक मिळणार का? हा प्रo्न नागरिकांना भेडसावत आहे. आधार क्रमांक न मिळाल्यास निम्म्याहून अधिक गॅस ग्राहकांना अनुदानापासून वंचित राहवे लागणार आहे.

गॅस वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी थेट ग्राहकांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येत आहे. बँक खात्यावर अनुदान जमा होण्यासाठी ग्राहकांकडून आधार क्रमांक देण्याचे गॅस एजन्सीने बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागातील 55 टक्के तर शहरातील 50 टक्के लोकांकडे अद्याप आधार कार्ड नाही. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आधार कार्ड काढण्यासाठीची यंत्रणा नसल्याने नागरिकांची दमछाक होत आहे.

ग्रामीणमध्ये 79 ठिकाणी नोंदणी

उत्तर सोलापूर 4, दक्षिण सोलापूर 1, पंढरपूर 6, सांगोला 3, करमाळा 8, मोहोळ 8, अक्कलकोट 3, मंगळवेढा 9, माढा 13, बार्शी 5 अशा 60 ठिकाणी नोंदणी सुरू आहे. याशिवाय महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून माळशिरस 3, पंढरपूर 9, अक्क्लकोट 4, करमाळा, माढा व मंगळवेढा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा 10 मशीन सुरू आहेत.

शहरात फक्त नऊ मशीन

शहराची 14 लाख लोकसंख्या आहे. सात लाख लोकांनी आधार कार्ड काढले आहे. शहरात संबंधित भागातील नागरिकांनी मागणी केल्यानंतर सहा ठिकाणी आधार नोंदणी सुरू आहे. मात्र, त्याठिकाणीही नागरिकांची गर्दी आहे. आधार नोंदणी केंद्राची तोकडी संख्या व मनपा, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी मागणी असूनही आधार नोंदणी केंद्र मिळत नाही.


महा ई-सेवा केंद्राकडे 36 मशीन

आधार नोंदणीस गती यावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी शासनाशी पत्रव्यवहार केला होता, त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या 36 मशीन महा ई-सेवा केंद्राकडे 6 जानेवारी रोजी देण्यात आल्या आहेत. या मशीनवरून अद्याप आधार नोंदणी सुरू नसल्याचे समजते. या मशीनवरून आधार नोंदणी झाल्यास आधार नोंदणीस गती येणार आहे.

आणखी मशीन मिळतील

आधार नोंदणीसंदर्भात सोलापूर जिल्ह्याची स्थिती राज्य शासनाला कळवली आहे, यानुसार आधार नोंदणीसाठी आणखी मशीन उपलब्ध होणे आवश्यक आहे. उपलब्ध मशीनच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहोत.’’ भारत वाघमारे, जिल्हा समन्वयक, यूआयडी

75 हजार जणांनी दिले

सोलापुरातील 10 जानेवारीपर्यंत 5 लाख 25 हजारांपैकी 75 हजार गॅस ग्राहकांनी आधार क्रमांक जोडून दिला आहे. एजन्सीकडे जमा झालेले अर्ज येत आहेत. आधार कार्ड कमी असल्याने ही प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होईल. मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा आहे.’’ माधव कोरवार, सरव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

तरी जमा होणार अनुदान

आधार कार्ड मार्चपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये जमा करावे लागेलच. सध्या गॅस अनुदान मिळण्यासाठी गॅस ग्राहक क्रमांक, बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांक संबंधित गॅस एजन्सीकडे जमा केल्यास संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर गॅस अनुदान जमा होणार आहे.’’ सुधीर खरटमल, अध्यक्ष, गॅस डिलर असोसिएशन