आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 47 Thousand Young People Giving Vote First Time, Divya Marathi

47 हजार नवयुवक पहिल्यांदाच देतील मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात 18 वष्रे पूर्ण केलेले 47 हजार 952 नवमतदार यंदा पहिल्यांदाच मतदानाला सामोरे जाणार आहेत. मोठय़ा संख्येने नवयुवक मतदानास सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यालयाने यंदा पहिल्यांदाच मतदार नोंदणीसाठी विविध उपक्रम राबवले. शिवाय तीन लाख बोगस नावेही डिलिट केली.
मतदानामध्ये वाढ करण्यासाठी तरुणांची अधिक नोंदणी व्हावी, यासाठी शहर-जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलाविली होती. त्यामुळे नवमतदारांच्या संख्येत भरीव वाढ झाली. सोलापूर मतदारसंघात 19 हजार 39 युवक, तर 8 हजार 530 युवतींनी नाव नोंदवले आहे. माढा मतदारसंघामध्ये 15 हजार 698 युवक, तर 7 हजार 315 युवती मतदानास सामोरे जातील.

तालुकानिहाय नवमतदार
सोलापूर लोकसभा : दक्षिण सोलापूर : 4131, अक्कलकोट : 2934, शहर मध्य : 3680, शहर उत्तर : 3876, मोहोळ : 4212, पंढरपूर : 5 हजार 736.
माढा लोकसभा : माढा : 5213, माळशिरस : 3877, करमाळा : 2689, सांगोला : 4427, माण : 4110, फलटण : 2687.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यभरात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 65 हजार 692 जणांनी नाव नोंदविले आहे. या सर्व मतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात येणार आहे. या सर्व मतदारांना मतदानापूर्वी बीएलओकडून ओळखपत्र घरपोच केले जाणार आहे. यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ओळखपत्र वाटप करण्याचे काम सुरू झाले असून येत्या तीन दिवसांमध्ये वाटप पूर्ण करण्यात येणार असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.