आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 48 Students Get Food Poision, Culprits Will Be Punish

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

४८ विद्यार्थ्यांना विषबाधा, दोषींवर कारवाई होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्कलकोट,सोलापूर - अक्कलकोटमधीलअनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील (अक्कलकोट स्टेशन रोड) ४८ मुलांना पोह्यातून विषबाधा झाली. २२ जणांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर २६ जण अक्कलकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सिव्हिल रुग्णालयाचे अधीक्षक डी. डी. गायकवाड यांनी सांगितले.
अक्कलकोट स्टेशन रोड येथील शासकीय निवासी शाळेत ७५ विद्यार्थी शिक्षण घेतात. या मुलांना सकाळी दूध, पोहे शिरा हा नाश्ता देण्यात येतो. ४८ विद्यार्थ्यांना नाश्ता केल्यानंतर मळमळ होऊन उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यापैकी २१ विद्यार्थ्यांना पोटात दुखण्याचे उलटीचे प्रमाण तीव्र झाल्याने प्राथमिक उपचारासाठी अक्कलकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काहीची प्रकृती गंभीर असल्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात २६ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र बनसोडे यांनी दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. रात्री उशिरापर्यंत अक्कलकोट पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.
आम्हाला शिळे, शिक्षकांना ताजे
आम्हानिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी शिळे पोहे देण्यात येतात. शिक्षकांना मात्र ताजे पोहे देण्यात येतात. काल दुपारी केलेले पोहे राहिले म्हणून सकाळच्या पोह्यामध्ये घालून आम्हाला दिले. असे वारंवार होते. शिक्षकांना ताजे पोहे देण्यात येत असल्याचे एका विद्यार्थ्याने दैनिक ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रवींद्र बनसोडे म्हणाले, अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच नेमके कारण समजू शकेल.
ठेका रद्द
जीवनज्योती बचत गटाचा ठेका रद्द करण्यात आला आहे. ४८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती चांगली आहे. पुढे अशी घटना होऊ नये यासाठी सूचना देण्यात येतील. मनीषाफुले, सहायक समाजकल्याण आयुक्त
सि‌व्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल २२ विद्यार्थी
राहुलबनसोडे, प्रमोद सोनकांबळे, गौरव गायकवाड, सूरज गायकवाड, श्रीमंत हत्ताळे, अजय शिंदे, अमोल बनसोडे, आकाश गायकवाड, दत्तात्रय पांढरे, शहाणू गायकवाड, रमेश बनसोडे, पिरप्पा गायकवाड, अजय राठोड, गौरव गायकवाड, विजय गाडे, राकेश दावल, कल्याणी दसाडे, अभिजित बनसोडे, पिरप्पा धर्मसाले,अविनाश बनसोडे, अमोल सोनकांबळे, परमेश्वर बनसोडे. हे विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
अक्कलकोट रुग्णालय, दाखल २६ विद्यार्थी
सागरकेरहार, निखील जाधव, गणेश बनसोडे, निखील डोणगे, आशिष बनसोडे, वीरेश वाघमारे, स्वामीनाथ हालोळे, आदित्य धोत्रे, दत्तात्रय धर्मसाले, ओंकार, जीवन सोनकांबळे, उमेश टोळगे, देवदत्त कदम, रोहित गायथोडे, काशिनाथ साळुंके, कुणाल बनसोडे, सिद्धार्थ कांबळे, महेश गायकवाड, धर्मेंद्र डोळे, प्रदीप दोडमनी, अमोल गायकवाड, म्हाळप्पा धर्मसाले, सागर भणगे, श्रीमंत आयवळे, सुरेश बनसोडे, समर्थ कटकधोंड.