आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान विशेष: खजुराची ५० लाखांची उलाढाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रमजान महिना आला की, खजुराची मागणी वाढते. आता तर आखाती देशातील उच्च प्रतीच्या खजुराचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. शहरात खजुराची दररोज किमान ५० लाख रुपयांची उलाढाल होते, असा अंदाज व्यापारी रिजवान मुल्ला यांनी व्यक्त केला. केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर हिंदू बांधवही या काळात खजूर खरेदी करत असतात, असे त्यांनी सांगितले.
अबब...५० प्रकारचे खजूर : बाजारात सुमारे पन्नास प्रकारचे खजूर विक्रीस आले आहेत. इराण, सौदीअरब, इस्राईल, ओमान आदी आखाती देशांतून आयात केलेले आहेत.
प्रकार दर (प्रतिकिलो) : अज्वा: ३००० रुपये, कल्मी : १२००, सफवी : १२००, अंबर : १२००, बरारी : ६००, मीरबस : ६००, मफरुफ : ३५०, मिस्री : ३२०, फरद : २२०, कलम : २४०, सिंफनी : २८०, मरहबा : २४०, खलिफा : २६०, मरजब : २८०, अलबुर्ज : १०००, डेट्स : ५००, ओमानी : ३०००, ईरानी : १००, कपकप : १४०, लुलू : २२०, पमा : २४०, किमीया : २८०, माक्सी : ३००, ब्लॅक फ्रूट : २००, सोपा : २००, ओमनी : २००, जबील : २००, ब्लॅक सीडलेस : २०० आदी.
विविध प्रकारचे खजूर बाजारात
- रमजान महिन्यात विविध प्रकारचे खजूर आणण्याचे काम १५ वर्षांपूर्वी सुरू केले. शहरात दहा दुकाने अाणि सुमारे दोन हजार चार चाकी गाड्या असतील. सर्व मिळून सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल होत असावी.
रिजवान मुल्ला, खजूर व्यापारी