आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 51 Thousand Tirupati Ladu In Solapur For Markandey Rathotsav

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्कंडेय रथोत्सवासाठी यंदा तयार होताहेत 51 हजार तिरुपती लाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव 20 ऑगस्ट रोजी आहे. त्या दिवशी सिद्धेश्वर पेठेतील मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना तिरुपती लाडू देण्याचे नियोजन केल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांनी दिली. गेल्या वर्षी 30 हजार लाडू बनवले होते. यंदा 51 हजार लाडू बनणार असून, त्याचा दरही दहा रुपयेच ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

र्शावणातील नारळी पौर्णिमेला मार्कंडेयांचा रथोत्सव असतो. दर्शनासाठी मंदिरात पहाटेपासूनच हजारो भाविकांची गर्दी असते. विजापूर वेसपर्यंत भाविकांच्या रांगा लागतात. दर्शन घेतल्यानंतर यज्ञोपवित (जान्हवे) धारण करण्याची प्रथा आहे. त्यानंतर भाविकांना शिरा प्रसाद म्हणून मिळायचा. गेल्या वर्षीपासून या प्रसादात बदल झाला.

तिरुमलाचा अस्सल स्वाद
तिरुपती येथील आचारी (वंटा वल्लभलु) सोलापुरात येऊन लाडू बनवतात. त्यामुळे तिरुमला तिरुपतीचा अस्सल स्वाद त्याला येतो. गेल्या वर्षी 30 हजार लाडू भाविकांची मागणी पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळेच यंदा त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याही र्शी. कारमपुरी म्हणाले.

लाडूला मिळाले पेटंट
तिरुपती येथे तयार होणार्‍या लाडवाला भौगोलिक बनावटीचे प्रमाणपत्र (जीआयए : पेटंट) मिळाले आहे. तशाच प्रकारचा लाडू बनवून घ्यायचा असेल तर तिरुपती देवस्थानम्शी बोलावे लागते.
-व्ही. मणी, आचारी, तिरुमला तिरुपती

असा होतो तिरुपती लाडू
उच्च् दर्जाचे बेसन पाण्यात भिजवून पातळ केले जाते. मोठय़ा छिद्रांच्या जाळ्यातून गाईच्या तुपात बुंदी पाडली जाते. नंतर साखरेच्या पाकात टाकून ती वाळत घालतात. थोडी वाळली की, त्यात केसर, वेलदोडा, काजू, बदाम, चारोळ्या, खडीसाखर घालून त्याची गोलाकार बांधणी होते. वरून काजूच्या फोडी खोवल्या जातात.

16 पासून काम सुरू
16 ऑगस्टला तिरुपती येथील आचारी सोलापूरला येईल. त्याच दिवसापासून लाडू बनवण्याचे कामही सुरू होईल.