आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 6 Pilgrims Killed Near Solapur As Speeding Car Rams Into Dindi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरजवळ कारने 6 वारक-यांना चिरडले, युपीमध्‍ये 5 कुंभ भाविकांचा मृत्‍यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर/जौनपूर- माघ महिन्यातील वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारक-यांचा काळाने घात केला. शनिवारी पहाटे सोलापूर - हैदराबाद महामार्गावरील दिंडीत एक कार घुसून झालेल्या भीषण अपघातात 6 वारकरी ठार तर अकरा जण जखमी झाले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हैदराबाद महामार्गावर बोरामणीजवळ तळ दक्षिण सोलापूर चाकोटे पंपासमोर हा अपघात झाला. सिंदगावचे वारकरी माघ महिन्यातील वारीनिमित्त पंढरपूरला निघाले होते. त्यांच्या दिंडीत भरधाव वेगाने आलेली एक कार घुसली. तीन वारकरी जागीच ठार झाले. दोघांचा रुग्णालयात पोहोचण्‍यापूर्वी मृत्यू झाला. तर एकाने उपचारादरम्‍यान अखेरचा श्‍वास घेतला. अपघातात जखमी झालेल्‍या 11 वारक-यांना सोलापूरातील रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे, कुंभ मेळ्यातील भाविकांवरही काळाने घाला घातला आहे. उत्तर प्रदेशात जौनपूरजवळ भाविकांना नेणारी जीपची ट्रकला धडक बसल्‍यामुळे भीषण अपघात झाला. त्‍यात 5 जण ठार तर 8 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण कुंभमेळ्यातून परतत होते. मृतकांमध्‍ये 3 महिलांचा समावेश आहे. ट्रकला ओव्‍हरटेक करण्‍याच्‍या प्रयत्‍नात जीपचालकाचा ताबा सुटला आणि जीप ट्रकला धडकली. त्‍यानंतर ट्रकही अनियंत्रित झाला आणि रस्‍त्‍याच्‍या कडेला एका झाडाला धडकला.