आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 680 Children Are External School In Solapur City

शहरात आढळली ६८० शाळाबाह्य मुले, ३३६ मुलांनी कधीच पाहिली नाही शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेकडून शनिवारी शहरातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात एक लाख ६७ हजार ५५७ कुटुंबांना भेट देऊन ६८० शाळाबाह्य मुले शोधून काढण्यात आली. यामध्ये ३३६ मुले कधीच शाळेत गेलेली नाहीत, तर ३४४ मुलांनी मधेच शाळा सोडली असल्याचे आढळून आले.
राज्य शासनाच्या आदेशानुसार सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये महापालिकेच्या २३४६ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शहरातील ५१ प्रभागांतील शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करण्यात आला. महापालिका शिक्षण मंडळाचे उकृष्ठ नियोजन यानिमित्त दिसून आले. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी होम मैदान, रेड लाइट एरिया, मुल्ला बाबा टेकडी, पारधी वस्ती येथे भेट दिली. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे यांनी २३ ठिकाणी भेट दिली.
५१ प्रभागांत झाले सर्वेक्षण : प्रभाग क्रमांक १४ २५ मध्ये एकही मुलगा शाळाबाह्य आढळून आला नाही. याशिवाय प्रभाग क्रमांक १३, २१, २७, ३१,३२ आणि ४७ मध्ये प्रत्येकी एक मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.

शनिवारी दिवसभर घरोघरी भेट देऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.
३३ प्रभागामध्ये सर्वाधिक २४ मुले शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले.यात मुले १६ तर मुली ८. मध्येच शाळा सोडलेले १२. आढळून आले.
मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार
- मनपा शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षक या सर्व्हेत सहभागी होते. नियोजन केल्याने प्रत्येक घरापर्यंत पोहोचता आले. ६८० मुले शाळाबाह्य आढळली. या मुलांचे आठ दिवसांत आधार कार्ड काढून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येईल.
विष्णू कांबळे, मनपाशिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी