आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Persons Including 6 Students Killed In Accident Near Solapur

शालेय सहलीच्‍या बसला भीषण अपघात, 6 विद्यार्थ्‍यांसह 7 जणांचा मृत्‍यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शाळेच्‍या सहलीच्‍य बसला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यात झालेल्‍या भीषण अपघातात 6 विद्यार्थ्‍यांसह चालकाचा मृत्‍यू झाल्‍याची दुर्दैवी घटना घडली आहे. माळुंब्रा गावात अपघात झाला.

प्राप्‍त माहितीनुसार, एका खासगी बसने शाळेच्या बसला समोरुन जोरदार धडक दिली. त्‍यात 7 जणांचा जागीच मृत्‍यू झाला. तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्‍त बसमध्‍ये कोल्हापूरच्या सांगवडे माध्यमिक शाळेचे विद्यार्थी सहलीसाठी जात होते. काल रात्री कोल्हापूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी बस निघाली होती. रात्री एका ठिकाणी थांबली असता दुसऱ्या एका खाजगी बसने धडक दिली. तुळजापूरपासून 15 किमी अंतरावर नागोबा देवस्थानाजवळ एका धोकादायक वळणावर खासगी बसच्‍या चालकाला वेगावर नियंत्रण मिळविता आले नाही. अनियंत्रित बस थेट शाळेच्‍या बसला धडकली. खासगी बस एका ट्रॅव्‍हल्स कंपनीची असून ती नागपूरहून सोलापूरला निघाली होती.

मृतांमध्ये अक्षय पाटील, वल्लभ कंभे, गणेश कुंभार, आकाश शिर्के, सुरज पाटील, पंकज कुंभार यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी सोळा वर्षांचे होते. मृत बसचालकाचे नाव प्रताप सुर्वे असे आहे. आकाश जाधव, अजय मोहिते, ऋषिकेश बभान, दिशांत जाधव, सौरभ सरगौंडा, दर्शन लोखंडे, प्रदीप देसाई, शैलेष जिरगे, रोशन बिरांजे, प्रकाश नेमगौंड पाटील अशी जखमींची नावे आहेत.