आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगल झाल्याचे सांगत 7 तोळे दागिने लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पुढे दंगल सुरू आहे. सुरक्षेसाठी म्हणून अंगठय़ा आणि लॉकेट काढून ठेवा, असे सांगत दोघांनी सात तोळे सोन्याचे दागिने पळवले. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमाराला साखर पेठ परिसरातील महिबूब सुभानी दग्र्याजवळ घडली. सूत व्यापारी बाबूराव कणगुनवार (वय 85, रा. गुरुवार पेठ) यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे.
र्शी. कणगुनवार कामानिमित्त घरातून बाहेर निघाले होते. अचानक दोन तरुण आले. पुढे दंगल सुरू आहे असे सांगून दागिने काढून ठेवण्यासाठी रूमाल दिला. गळ्यातील चार तोळ्यांचे लॉकेट, तीन तोळ्यांच्या तीन अंगठय़ा (प्रत्येकी एक तोळे) असे सात तोळे दागिने काढून घेतले. रूमालामध्ये बांधून ठेवण्याचा बहाणा करत दोघांनी पळ काढला. काही वेळानंतर कणगुनवार यांनी रूमाल उघडून पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जेल रोड पोलिसांत जाऊन त्यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. फौजदार लालासाहेब डाके तपास करत आहेत.